४३ देशांच्या नागरिकांना ‘व्हिसा ऑन अरायव्हल’

0
76

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिजी आणि प्रशांत महासागरी देशांसह जवळजवळ ४३ देशांच्या नागरिकांना भारतात आल्यावर व्हिसा देण्याची योजना (व्हिसा ऑन अरायव्हल) आजपासून कार्यान्वित होणार आहे. या प्रवाशांचे इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल अथॉरायझेशनही करता येईल.यासंदर्भात नागरिकत्व (सुधारणा) विधेयकही मांडले जाणार असून त्याद्वारे भारतीय मूळ असलेली व्यक्ती (पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन – पीआयओ) आणि भारताचे विदेशातील नागरिकत्व (ओव्हरसीज सिटिझनशीप ऑफ इंडिया – ओसीआय) या दोन्ही गटांतील व्यक्तींना समान निकष लावले जातील. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअरमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आश्वासन दिले होते. लवकरच या विधेयकाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे ठेवला जाणार आहे.
पीआयओ कार्डधारकांना आजीवन व्हिसा, भारतात दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या पीआयओंना पोलीस स्थानकात हजेरी लावण्यापासून सूट इ. ची कार्यवाही यापूर्वीच सुरू झाली आहे.