२५ गावांत कृषी सर्वेक्षण पूर्ण

0
96

कृषी उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने राबविलेल्या महत्वाच्या योजनेनुसार खात्याने निवडलेल्या २५ गावातील शेतकर्‍यांचे सर्वेक्षण जवळ जवळ पूर्ण झाले असून, शेतकर्‍यांच्या सूचनांनुसार वरील संबंधित गावामध्ये शेतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती खात्याचे संचालक आर्नाल्ड रॉड्रिग्स यांनी दिली.सध्या बँक अधिकार्‍याला बरोबर घेऊन खात्याचा अधिकारी वरील गावातील शेतकर्‍यांच्या घरी भेट देत आहे. शेतावर जाण्यासाठी रस्ते, तलावांचे दुरुस्तीकाम, भात ठेवण्यासाठी गोदाम, अशा शेतकर्‍यांच्या गरजा समजून घेतल्यानंतर, खाते सरकारला योग्य तो प्रस्ताव सादर करेल. शेत जमीन पडीक ठेवू नये म्हणून ही योजना राबविल्याचे रॉड्रिग्स यांनी सांगितले. पूर्ण कृषी विकास हा हेतू असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शेती उत्पादन वाढविण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. शेतकर्‍यांच्या सर्व अडचणी दूर करण्याची पर्रीकर यांनी तयारी ठेवली आहे. वरील योजनेखाली खात्याने प्रत्येक तालुक्यातील दोन गावांची निवड केली आहे.