२५८ कोरोना रुग्णांचा राज्यात नवा उच्चांक

0
141

>> एकूण रुग्णसंख्या पाच हजार पार; आणखी एकाचा मृत्यू

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. नवीन २५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले. मडगाव येथील कोविड इस्पितळात आणखी एका रुग्णाचे निधन झाल्याने कोरोना बळीची संख्या आता ३६ झाली आहे. राज्यातील कोरोना एकूण रुग्णांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला असून ऍक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या १६७३ एवढी आहे.

नवेवाडे वास्को येथील ५८ वर्षीय व्यक्तीचे को-मॉर्बिडमुळे निधन झाले. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील आणखी १३३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५११९ झाली असून त्यातील ३४१० रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात ६११६ स्वॅबचे नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रयोगशाळेतील ८२४९ स्वॅबच्या नमुन्यांपैकी २१३३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात ३० कोरोना संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

अवर सचिव पॉझिटिव्ह
सचिवालयातील एक अवर सचिव कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला राज्य नागरी सेवेतील पहिलाच अधिकारी आहे.

चिंबलमध्ये नवे ३७ रुग्ण
चिंबल परिसरात नवे ३७ रुग्ण आढळले असून या भागातील रूग्णांची संख्या आता ७९ झाली आहे. शिवोली येथे नवीन १ रुग्ण आढळला आहे.

कांदोळीत नवीन १७ रुग्ण
कांदोळी येथे नवे १७ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३९ झाली आहे. बेतकी येथे नवीन ४ तर हळदोणा येथे नवीन १ रुग्ण आढळला आहे.

पणजीत नवे ७ रुग्ण
पणजी शहरात नवीन ७ रुग्ण आढळून आले आहे. मिरामार, करंजाळे, मळा आदी भागात रुग्ण आढळून आले असून या भागात मंगळवारी निर्जंतुकीकरण केले जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

वास्कोत नवे २४ रुग्ण
वास्को परिसरात नवीन २४ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ३६३ झाली आहे. लोटलीत नवे २ रुग्ण आढळले आहेत.

बाळ्ळीत नवे २७ रुग्ण
बाळ्ळी येथे नवे २७ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ३९ झाली आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये नवे रुग्ण आढळले असून एका कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मडगावात नवीन १३ रुग्ण
मडगावात नवे १३ रुग्ण आढळले असून मडगावातील रुग्ण संख्या ११६ झाली आहे. कासावली येथे नवा १ रुग्ण आढळला आहे.

फोंड्यात नवे ७ रुग्ण
फोंड्यात नवे ७ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ७८ झाली आहे. मडकईत ३ रुग्ण आढळले आहेत.

कुंकळ्ळीचे आमदार कोरोनामुक्त कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांचा कोविड अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना पुढील उपचारार्थ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या ३० जूनला त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.