२० जानेवारीपर्यंत नवीन मतदार कार्ड वितरण

0
103

गोवा विधानसभा

मतदार आकडेवारी

* एकूण मतदार- ११ लाख ९८०
* पुरुष मतदार- ५ लाख ४५,५३१
* महिला मतदार- ५ लाख ६२,९३०
* नवीन मतदार- ४५ हजार
* वगळलेली मतदारसंख्या- २२ हजार

गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी शेवटची मुदत दि. ८ जानेवारी असून या काळात नाव नोंदणी न केलेल्यांनी तालुका पातळीवरील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी काल केले. दि. २० पर्यंत नवीन मतदान कार्डे वितरीत केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
नावनोंदणीसाठी चार दिवसांची मुदत दिल्याने त्यासंबंधींची जागृती सोशल मिडिया व मुद्रित माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी काल मतदार यादी जाहीर केली. मतदार यादीत सुमारे ४४ टक्के मतदार १८ ते ४० वयोगटातील असल्याचे आढळून आले आहे.
काल जाहीर केलेल्या मतदार यादीनुसार राज्यातील एकूण मतदार ११ लाख ९८० तर पैकी ५ लाख ४५ हजार ५३१ पुरुष व ६ लाख ६२ हजार ९३० महिला मतदार आहेत. निवडणूक कामात असलेल्यांची संख्या ८२० इतकी आहे. यावेळी नवीन ४५ हजार मतदारांची नोंदणी झाली तर वेगवेगळ्या कारणामुळे २२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आल्याची माहिती कुणाल यांनी दिली.