१८ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या

0
106

गोवा नागरी सेवेतील १८ वरिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक (प्रशासन) संजीव गडकर यांची कोऑपरेटिव्ह सोसायटीचे रजिस्ट्रार म्हणून बदली करण्यात आली आहे. गोवा कला अकादमीचे सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर यांची उच्च शिक्षण संचालकपदी तर नागरी तंटा संचालक दत्ताराम सरदेसाई यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालकपदी (प्रशासन) बदली करण्यात आली आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव लेव्हिन्सन मार्टिन्स यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालकपदी बदली करण्यात आली असून त्यांना गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

सहकार निबंधक गुरुदास पिळर्णकर यांची कला आणि संस्कृती खात्याचे संचालक म्हणून बदली करण्यात आली असून त्यांना गोवा कला अकादमी सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. एनआरआय संचालक मॅल्विन वाझ यांची गोवा राज्य निवडणूक आयोग सचिवपदी बदली करण्यात आली आहे. महिला व बालविकास संचालक रुही रेडकर यांची उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. स्थलांतरितांच्या मालमत्तेचे कस्टोडियन नारायण प्रभुदेसाई यांची बदली कोलवाळ मध्यवर्ती तुरुंग अधीक्षकपदी करण्यात आली आहे. सध्या कोणताही पदभार नसलेल्या दीपक देसाई यांना महिला व बालविकास संचालकपदाचा ताबा देण्यात आला आहे. मुरगावच्या मुख्याधिकारी दीपाली नाईक यांची संयुक्त सचिव शिष्टाचारपदी बदली झाली आहे. गोवा गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धीविनायक नाईक यांना अतिरिक्त पदापासून मुक्त करण्यात आले आहे.

अतिरिक्त पंचायत संचालक (२) राजेंद्र मिरजकर यांची तुरुंग महानिरीक्षकपदी, कोलवाळ येथील मध्यवर्ती तुरुंगाचे अधीक्षक शामसुंदर परब यांची एनआरआय संचालकपदी, बार्देश उपजिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांची पंचायत (१) चे अतिरिक्त संचालकपदी, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दशरथ रेडकर यांची बार्देश उपजिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी, सध्या कोणताही पदभार नसलेले आग्नेल फर्नांडिस यांची मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारीपदी, डीआयटीसीचे सरव्यवस्थापक पंढरीनाथ नाईक यांची दक्षिण गोवा जिल्हा पंचायतचे सीईओपदी तसेच मडगाव रवींद्र भवनचे सदस्य सचिवपदाचाही ताबा देण्यात आला आहे.

अतिरिक्त पंचायत संचालक (१) फ्लोरिना कुलासो यांची पंचायत संचालक (२) म्हणून बदली करण्यात आली आहे. तर गोवा राज्य निवडणूक आयोग दर्शना नेरुलकर यांची डीआयटीसीच्या सरव्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली आहे. गोवा पुनर्वसन मंडळाचे सचिव जयंत तारी यांच्याकडे कला अकादमीच्या संचालक पदाचा (प्रशासन) अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.