१७५ पंचायतींचा आज फैसला

0
82

>> २ जुलै रोजी ११ पंचायतींची मतमोजणी

११ जून रोजी गोव्यात झालेल्या पंचायत निवडणुकांसाठीची मतमोजणी आज १३ जून रोजी होणार असून त्यासाठीची जय्यत तयारी काल सुरू होती. ११ जून रोजी १८६ पंचायतींसाठी निवडणूक झाली होती. त्यांपैकी ११ पंचायतींमधील १६ प्रभागांची निवडणूक येत्या १ जुलै रोजी होणार असल्याने त्या ११ पंचायतींची मतमोजणी २ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. उर्वरित सर्व पंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पेडणे तालुक्यातील काही पंचायतींची मतमोजणी पेडणे येथील सेंट जोझेङ्ग हायस्कुलात तर काही पंचायतींची तुये पंचायत सभागृहात होईल. डिचोली तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी वाठादेव, सर्वण येथील नारायण झांटये क्रीडा संकुल सभागृहात, सत्तरीतील वाळपईच्या वन प्रशिक्षण सभागृहात, बार्देसमधील पेडे येथील बॅडमिंटन हॉल व सरकारी क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये, तिसवाडीतील ‘साग’ क्रीडा सभागृहात तसेच इनडोअर स्टेडियम – कांपाल येथे, ङ्गोंड्यातील मतमोजणी कुर्डी क्रीडा संकुलात, धारबांदोड्याची तामसोवाडा सरकारी शाळा संकुलात, सांगेतील खैरीकाटे येथील सरकारी क्रीडा संकुलात, सासष्टाची दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इमारतीत, मुरगावची बुटेभाट क्रीडा संकुलात, केपेची बोरीमळ क्रीडा संकुलात तर काणकोणची मामलेदार कार्यालयात मतमोजणी होईल.
११ पंचायतींची २ जुलैला मतमोजणी
पेन्ह-द-ङ्ग्रान्स, हणजूण-कायसूव, बेतकी-खांडोळा, मेरशी, अडवलपाल, कुडका-बांबोळी, तळावली, बस्तोडा, बेताळभाटी, नुवें, सांकवाळ व चांदर या अकरा पंचायतींची मतमोजणी २ जुलै रोजी होणार आहे. वरील पंचायतींच्या एकूण १६ प्रभागांकरीता निवडणूक १ जुलै रोजी होणार आहे. पैकी १० पंचायतींच्या १५ प्रभागांचे निवडणूक प्रकरण न्यायालयात गेल्याने तर चांदर पंचायतीच्या प्रभागाची निवडणूक एका उमेदवाराचे निधन झाल्याने पुढे ढकलण्यात आली आहे.
१३ केंद्रांतून मतमोजणी
१३ केंद्रांवर मतमोजणी होणार असून त्यासाठी २१ हॉलमध्ये २९३ टेबल्स घालण्यात आली आहेत. मतमोजणीच्या कामासाठी १५०० कर्मचारी असतील. तसेच एकूण २१ निरीक्षकही असतील. मतमोजणीच्या वेळी भारतीय राखीव दलाच्या जवानांच्या तुकड्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत.
मतमोजणी सभागृहात मोबाईल नेण्यास बंदी
मतमोजणीच्या वेळी उमेदवारांना तसेच त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना मतमोजणी सभागृहात मोबाईल, टॅब तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येणार नाहीत. कागद व पेन नेण्यास परवानगी असेल. निर्वाचन अधिकारी व सहाय्यक निर्वाचन अधिकारी यांनाच इलेक्ट्रॉनिक वस्तू (मोबाईल टॅब आदी) नेण्यास परवानगी असेल.

येथे होईल मतमोजणी…
तालुका मतमोजणी केंद्र
पेडणे- सेंट जोझेङ्ग हायस्कूल, पेडणे व तुये पंचायत सभागृह
डिचोली- नारायण झांटये क्रीडा संकुल सभागृह, सर्वण
सत्तरी- वन प्रशिक्षण सभागृह, वाळपई
बार्देश- बॅडमिंटन हॉल, पेडे व
बॉक्सिंग हॉल, सरकारी क्रीडा संकुल-पेडे
तिसवाडी- साग क्रीडा सभागृह व इनडोअर स्टेडियम-कांपाल
ङ्गोंेडा- क्रीडा संकुल-कुर्डी
धारबांदोडा-तामसोवाडा सरकारी शाळा संकुल
सांगे- सरकारी क्रीडा संकुल, खैरीकाटे-सांगे
सासष्टी- दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इमारत
मुरगाव- बुटेभाट क्रीडा संकुल
केपे- बोरीमळ क्रीडा संकुल, केपे
काणकोण-मामलेदार कार्यालय, काणकोण