१० दशलक्ष टन खनिजाचे वर्षअखेरीस उत्खनन शक्य

0
179

चालू आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत राज्यात जास्तीत जास्त १० दशलक्ष टन एवढे खनिज उत्खनन होऊ शकणार असल्याचे खाण खात्यातील सूत्रांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

आतापर्यंत राज्यात ६.७ दशलक्ष टन एवढे खनिज उत्खनन झालेले आहे व मार्च महिन्यापर्यंत जास्तीत जास्त १० दशलक्ष टन खनिजाचे उत्खनन होऊ शकेल, असे दिसत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या अवघ्याच खाणी चालू आहेत. कित्येक खाणींना पर्यावरणविषयक दाखले मिळू शकले नसल्याने या खाणी सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने २० दशलक्ष टन एवढ्या खनिजाचे उत्खनन करण्याची मर्यादा घालून दिलेली असताना यंदा मात्र त्याच्यापेक्षा निम्म्या म्हणजेच १० दशलक्ष टन एवढ्याच खनिजाचे उत्खनन होऊ शकेल, असा अंदाज सध्याच्या आकडेवारीवरून दिसत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खाण खात्याने वाळू धोरण तयार करण्याचे काम यापूर्वीच हाती घेतलेले आहे.