१० डिसेंबर रोजी पेडण्यातील तीन पंचायतींच्या निवडणुका

0
155

राज्य निवडणूक आयोगातर्फे १० डिसेंबर रोजी कासारवर्णे, हळर्ण, चांदेल – हसापूर अशी तीन ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण निवडणूक तसेच पेडणे तालुक्यातील पालये ग्रामपंचयतीतील वॉर्ड क्रमांक १ आणि सांगे तालुक्यातील उगे ग्रामपंचायतीतील वॉर्ड क्रमांक ७, मडकई ग्रामपंचायतीतील वॉर्ड क्रमांक १ आणि कुंडई ग्रामपंचायतीतील वॉर्ड क्रमांक १ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

पेडणे, फोंडा आणि सांगे तालुक्यातील मामलेदारांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. २१ ते २८ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. २६ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने हा दिवस सोडण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून अर्जांची छाननी करण्यात येईल. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल.

१० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येईल. ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरवात होईल. सर्वसाधारण गटासाठी १०० रुपये आणि राखीव गटातील महिला किंवा वर्गीकृत जाती जमाती, इतर मागास वर्गासाठी ५० रुपये निर्वाचन अधिकार्‍यांकडे ठेवावे लागेल. प्रत्येक उमेदवारासाठी ४० हजार रुपये खर्च मर्यादा असेल.