होंडुरासचा फडशा

0
103

फिफा अंडर १७ ‘ई’ गटातील काल रविवारी झालेल्या लढतीत जपानने होंडुरासचा ६-१ असा फडशा पाडला. जपानच्या केटो नाकामुरा याने हॅट्‌ट्रिक नोंदविली. तांत्रिक तसेच कौशल्याच्या बाबतीत असलेला उजवेपणा जपानने काल दाखवून दिला. २२व्या मिनिटाला पहिला गोल अप्रतिम हेडरद्वारे नोंदविल्यानंतर ३०व्या मिनिटाला नाकामुराने आपला दुसरा गोल केला. ३६व्या मिनिटाला पॅट्रिक पेलासियोस याने पिछाडी कमी करणारा गोेल लगावला. मध्यंतराला दोन मिनिटे असताना नाकामुराने आपला व संघाचा तिसरा गोल केला. मध्यंतराला काही सेकंद असताना होंडुरासच्या बचावफळीतील गाफिलता हेरत कुबो याने जपानचा चौथा गोल करत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. तायेसी मियाशिरो याने ५१व्या मिनिटाला जपानचा पाचवा तर तोयची सुझुकीने ९०व्या मिनिटाला जपानचा सहावा गोल केला. होंडुरास व जपान यांचा पुढील सामना अनुक्रमे न्यू कॅलेडोनिया व फ्रान्स यांच्याशी होणार आहे.