होंडुरासकडून न्यू कॅलेडोनियाचा धुव्वा

0
105

कार्लोस मेजिया आणि जोशुआ कॅनालेस यांनी नोंंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मध्य अमेरिकेच्या होंडुरासने न्यू कॅलेडोनियाचा ५-० असा धुव्वा उडवित बाद फेरीतील आपले आव्हान जिवंत राखले.
कार्लोस मेजियाने २५व्या मिनिटाला होंडुरासचे खाते खोलले. जोशुआने कॅनालेसने २७व्या मिनिटाला आघाडी २-० अशी केली. ४२व्या मिनिटाला कार्लोसने स्वतःचा दुसरा व संघाला ३ -० अशा आघाडीवर नेणारा गोल नोंदविला. तर दुसर्‍या सत्रात पॅट्रिक पेलासिओसने (५१वे व ८८वे मिनिट) दोन गोल नोंदवित होंडुरासला मोठा विजय मिळवून दिला. होंेडुरासचा पुढील सामना आता गुवाहाटीत बलाढ्य फ्रान्सशी तर न्यू कॅलेडोनियाची लढत कोलकात्यात जपानशी होईल.

इराकला पूर्ण गुण
दरम्यान, कोलकाताच्या विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इराकने चिलीवर ३-० असा देखणा विजय नोंदविला. इराकतर्फे मोहम्मद दाऊदने (६वे व ६८वे मिनिट) दोन गोल नोंदविले. तर चिलीच्या डायगो वेलेंसियाने ८१व्या मिनिटाला स्वयं गोल नोंदविला. इराकचे दोन सामन्यांतून ४ गुण झाले असून ते इंग्लंड पाठोपाठ गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानी आहेत. आता पुढील सामन्यात इराकचा सामना इंग्लंडशी होणार असून त्यात लढतीत त्यांना बाद फेरी गाठण्यासाठी केवळ बरोबरीची गरज आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या चिलीची लढत मॅक्सिकोशी होईल.