हॉकी : गोलरक्षक श्रीजेश पुनरागमन

0
69

दुखापतीमुळे दीर्घकाळ स्पर्धात्मक हॉकीपासून दूर रहावे लागल्यानंतर भारताचा पहिल्या पसंतीचा गोलरक्षक पीआर श्रीजेश याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. गुरुवारपासून बंगळुरू येथे होणार्‍या राष्ट्रीय शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या ३३ सदस्यीय संघात त्याची निवड करण्यात आली आहे. मागील वर्षी अझलान शाह स्पर्धेदरम्यान त्याला गुडघ्याची दुखापत झाली होती. यामुळे तब्बल ८ महिने त्याला ‘ब्रेक’ घ्यावा लागला होता.

यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहे. यानंतर जुलैमध्ये नेदरलँड्‌समध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, ऑगस्टमध्ये जकार्ता येथे आशियाई स्पर्धा, ऑक्टोबरमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. तसेच नोव्हेंबरमध्ये भुवनेश्‍वर येथे हॉकी विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघ खेळणार आहे. त्यामुळे श्रीजेशचे पुनरागमन संघाला बळकटी देणारे ठरले आहे. भारतीय संघ यंदाच्या मोसमाची सुरुवात चार निमंत्रित देशांच्या स्पर्धेद्वारे करणार आहे. या स्पर्धेत न्यूझीलंड, बेल्जियम व जपान हे इतर तीन संघदेखील खेळणार आहेत.

गोलरक्षक ः आकाश चिकटे, सूरज कारकेरा, पीआर श्रीजेश व कृष्णन पाठक.
बचावपटू ः हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, दीपसेन तिर्की, वरुण कुमार, रुपिंदर पाल सिंग, बीरेंद्र लाक्रा, सुरेंदर कुमार, गुरिंदर सिंग, नीलम संजीप झेस व सरदार सिंग.

मध्यरक्षक ः मनप्रीत सिंग, चिंगलेनसाना सिंग, एसके उथप्पा, सुमीत, कोथाजीत सिंग, सतबीर सिंग, नीलकांता शर्मा, सिमरनजीत सिंग व हरजीत सिंग. आघाडीपटू ः एसव्ही सुनील, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, गुरजंत सिंग, रमणदीप सिंग, अरमान कुरेशी, अफ्फान युसूफ, तलविंदर सिंग व सुमीत कुमार.