हैदराबादची जमशेदपूरमध्ये कसोटी

0
110

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) मंगळवारी जमशेदपूर एफसीविरुद्ध हैदराबाद एफसीची लढत होत आहे. जमशेदपूर सलग दुसर्‍या विजयासाठी प्रयत्नशील असून त्यांच्याविरुद्ध हैदराबादच्या कमकुवत संघाची कसोटी लागेल.

हैदराबादचा हा पदार्पणाचा मोसम आहे. एटीकेविरुद्ध त्यांना ०-५ अशा नामुष्कीला सामोरे जावे लागले. दुसरीकडे जमशेदपूरने ओडिशा एफसीविरुद्ध ५० मिनिटांहून जास्त वेळ दहा खेळाडूंनिशी खेळावे लागूनही जिद्दीने आणि निर्धाराने खेळ केला. त्यात सर्जिओ कॅस्टेल याने अंतिम टप्यात निर्णायक गोल केला.मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ इरीओंदो यांना बिकाश जैरूच्या रेड कार्डनंतर डावपेच बदलावे लागले आणि संधीसाठी वाट पाहावी लागली. हैदराबादविरुद्ध मात्र पहिल्या सेकंदापासून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. पिटी हा ३८ वर्षांचा अनुभवी खेळाडू मुख्य मोहरा म्हणून भूमिका पार पाडेल. तो मध्य क्षेत्रातून संघाला दिशा देण्याचे काम करेल. सर्वांचे लक्ष कॅस्टेलवर असेल. त्याने सलामीच्या सामन्यात प्रभाव पाडला आहे. इरीओंदो यांनी सांगितले की, संघाची अजूनही जडणघडण सुरु आहे.

ओडिशाविरुद्ध खेळाडूंनी विलक्षण प्रयत्न कले आणि त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. पण आम्हाला सरस खेळ करायचा आहे. या घडीला आम्हाला अजूनही प्रगती करायची आहे. तेव्हा आमचे चेंडूवर नियंत्रण पुरेसे नव्हते, पण आम्ही सामन्यावर पकड ठेवली होती. इरीओंदो यांना जैरूी निलंबनामुळे, तर सी. के. विनीतची दुखापतीमुळे उणीव जाणवेल. ओडिशासाठी एटीकेविरुद्धचे पदार्पण अजिबात संस्मरणीय ठरले नाही. कोलकात्यामधील खेळ क्षमतेपेक्षा कमी होता. मार्सेलिनीयो, मार्को स्टॅन्कोविच, गाईल्स बार्न्स असे अनेक स्टार खेळाडू धडाडू शकले नाहीत. आदील खान याला बचावात्मक मध्यरक्षक म्हणून खेळविण्याच्या चालीचाही काहीच फायदा झाला नाही. हैदराबादचे प्रशिक्षक फिल ब्राऊन यांनी सांगितले की, पहिल्या सामन्यात आम्हाला काही धक्के बसले. आम्हाला पाच गोल पत्करावे लागले. असे घडत तेव्हा खेळाडूंना घरी परत गेल्यावर अवघड स्थितीला सामोरे जावे लागते. त्याचा मानसिकतेवर परिणाम होतो, पण आम्ही मनोधैर्य उंचावू शकलो. संघ म्हणून आता आम्ही ठिक आहोत.
बोबो, बार्न्स, रॅफेल मोमेझ आणि आशिष राय अशा खेळाडूंच्या दुखापतींचा हैदराबादला सामना करावा लागला. याशिवाय स्पेनचा मध्यरक्षक नेस्टर गॉर्डीलीओ हा सुद्धा निलंबित आहे. त्यामुळे ब्राऊन यांच्यासमोरील पर्याय कमी झाले.