हेरगिरीप्रकरणी अभियंत्याला तीन दिवस रिमांड

0
119

नागपूर
पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत असल्याच्या संशयावरून सोमवारी महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांच्या एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस लि. चा अभियंता निशांत अगरवाल याला येथील जिल्हा न्याय दंडाधिकारी एस. एम. जोशी यांनी तीन दिवसांच्या बदली रिमांडवर उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला. ब्राह्मोस क्षेपणास्त्र विषयक अत्यंत महत्वाची माहिती अगरवालच्या खाजगी संगणकावर आढळली. देशासाठी हा धोका असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.