हुडहुड वादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर

0
86

‘हुडहुड’ वादळाचे रुपांतर आता विनाशकारी चक्रीवादळात झाले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे प्रमुख एल. एस. राठोड यांनी काल दिली. ताशी १०० ते ११० कि. मी. वेगाच्या वार्‍यासह आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारी प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. चक्रीवादळ वरील प्रदेशांत रविवारपर्यंत थडकणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, ओडिशा सरकारने संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना सर्व खबरदारीच्या उपायांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.