हीनाचा सुवर्णवेध; निवेताला कांस्य

0
63

भारतीय नेमबाज हीना सिंधूने जर्मनीच्या हॅन्नोवर (आयएससीएच) आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मी. एअर पिस्तोल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. तर भारताच्या पी. श्री. निवेताला कांस्य पदक प्राप्त झाले.
हीना आणि रौप्य पदकप्राप्त फ्रान्सच्या मथिल्डे लामोल्ले यांच्यात २३९.८ अशी बरोबरी झाली होती. परंतु शूटआउटमध्ये हीनाने बाजी मारताना ९.४ वि. ८.७ अशी सरस कामगिरी करीत सुवर्ण पदक प्राप्त केले. भारताच्या पी. श्री. निवेताने २१९.२ गुणांसह कांस्य पदक मिळविले. हीनाचा या सुवर्ण पदकामुळे पुढील आठवड्यात २२ ते २५ मेपर्यंत म्युनिख येथे होणार्‍या आयएसएसहएफ विश्व चषक स्पर्धेसाठी आत्मविश्वास दुणावलेला असेल.