हळर्णमध्ये दोन गव्यांची हत्या

0
86
हळर्ण येथे मृत गव्यांची पाहणी करताना वन अधिकारी. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

बेकायदा वीज तार शेतात नेऊन केलेला प्रकार
विजेचा शॉक देऊन हळर्ण-पेडणे येथे दोन गव्यांची हत्या करण्याचा प्रकार घडला असून त्याबाबत पर्यावरणप्रेमीतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर माहितीनुसार हळर्ण-भागात ९ रोजी दोन गव्यांची हत्या झाल्याची माहिती प्राणीमित्र अमृतसिंग यांनी वनखात्याला दिल्यानंतर लगेच म्हापसा, पणजी, पेडणे वन अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन हत्या झालेल्या गव्यांचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना तेथे कापून टाकलेले गव्यांचे अवयव आढळले. वनअधिकार्‍यांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
ज्या परिसरात शेतात गव्यांची हत्या करण्यात आली त्यापासून ५०० मीटरच्या अंतरावर श्री सातेरी मंदिराजवळील वीज खांब्यावरून थेट हूक लावून बेकायदेशीरपणे वीज तार ५०० मीटरवर नेऊन ज्या ठिकाणाहून गवे शेतात उतरतात, त्या मुख्य वाटेवर जमनीपासून एक मीटर उंचावर ही वीज तार घालण्यात आली होती. एका गव्याने वीजेच्या झटक्याबरोबर तारही नेली व गुंडाळला जाऊन मरण पावला.
दिवसा ढवळ्या हत्या
पेडणे वनअधिकारी विलास गावस यांच्याकडे संपर्क साधला असता, अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून याविषयी तपास चालू आहे. गव्यांची हत्या केल्यानंतर ज्या गव्यांचे दोन पाय कापले ती घटना दिवसा घडलेली आहे. रात्रीच्यावेळी हे कृत्य केले नसावे, असा संशय वन खात्याने व्यक्त करून गव्यांची हत्या करण्यासाठी वापरलेले साहित्य हूक व वायर जप्त करण्यात आल्याची माहिती विकास गावस यांनी दिली.
शेतकरी वैतागले
मोठ्या कष्टाने, मेहनत घेवून शेतकरी कष्ट करतात. शेती उत्पन्न करतात, दरवर्षी रानटी जनावरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसानी केली जाते, या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याला अपयश आले आहे. शेतकर्‍यांना भरपाईही मिळत नाही.