हल्लेखोरांनी पोलिसाचे पिस्तुल पळवले होते ?

0
104

>> गुन्ह्याचे गांभीर्य उमगताच परत

हरमल-पेडणे येथे छापा टाकण्यासाठी गेलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकावर हल्ला करणार्‍यांनी पथकातील एका पोलीस अधिकार्‍याचे रिव्हॉल्वर हिसकावून घेऊन पळ काढला होता व नंतर पोलिसांचे रिव्हॉल्वर हरवले होते व ते आम्हाला सापडले होते असे सांगून पेडणे पोलिसांकडे ते जमा करण्यात आल्याची खळबळजनक माहिती हरमल येथील सूत्रांनी दिली.

पेडणे पोलिसांचे या भागातील अमली पदार्थ व्यवहारात साटेलोटे आहेत व त्यासाठीच अमली पदार्थ विरोधी पथकाने हरमल येथे छापा मारण्यापूर्वी पेडणे पोलिसांना ह्या छापाची कोणतीही माहिती मिळणार नाही याची विशेष काळजी घेतली होती, असे सूत्रानी स्पष्ट केले.

हरमल, मांद्रें आदी किनार्‍यावर अमली पदार्थांचा पूर वाहत असून ड्रग माफियांकडून पोलिसांना पैसा जातो, त्यामुळेच त्यांना वरील किनार्‍यांवर अमली पदार्थांचा काळा धंदा करण्यास अभय मिळते असे सूत्रांचे म्हणणे आहे. किनारपट्टीवरील ही ड्रग माफियांची टोळी वजनदार असून त्यांचे कंबरडे मोडायचे झाल्यास गृह खात्याला त्यांच्याविरुध्द कठोर पावले उचलावी लागणार असल्याचे ह्या सूत्रांचे म्हणणे आहे. या भागातील ड्रग माफियांचे हात एवढे वरपर्यंत पोचले आहेत की सुमारे दीड वर्षापूर्वी मांद्रे येथे होऊ घातलेली किनारपट्टी पोलीस स्थानकही होऊ दिले गेले नाही. सरकार दरबारी