हरित लवादाचे स्वतंत्र खंडपीठ गोव्यात हवे

0
74

>> कॉंग्रेस पक्षाची मागणी

राष्ट्रीय हरित लवादाचे स्वतंत्र खंडपीठ गोव्यात स्थापन करण्यात यावे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल येथे पत्रकार परिषदेत केली. पर्यावरणासाठी लढणार्‍या लोकांची संख्या राज्यात मोठी असल्याने राज्यात राष्ट्रीय हरित लवादाच्या खंडपीठाची स्थापना करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. नवी दिल्ली येथील खंडपीठात जाणे गोमंतकीयांसाठी गैरसोयीचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संगीत महोत्सवात अमली पदार्थांचा वापर होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. गोव्याचा स्वतःचा असा ध्वनीप्रदूषण कायदा असायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले. राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याला दोन तज्ज्ञ असे सल्लागार देण्याच्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निर्णयावर त्यांनी जोरदार टीका केली. आरएसएसच्या लोकांना या पदावर आणायचे असल्याचा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला.