हरवळेतील अपघातात महिला ठार

0
70

साखळी – होंडा मुख्य रस्त्यावरील हरवळे येथील मारुती शोरूमजवळ काल सकाळी इनोव्हा कारने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गाडीतील रेन्सी जॉय (वय ३८) ही आजोबा नगर होंडा येथील महिला जागीच ठार झाली. तर पती बिजो जॉय किरकोळ जखमी झाला.

जीए ०४-सी-४१४३ क्रमांकाच्या इनोव्हा कारने बिजो जॉय व त्यांची पत्नी रेन्सी जॉय हे साखळीहून होंडा येथे जात असताना चालक बिजो जॉय यांचा कारवरचा ताबा सुटून कारने झाडाला धडक दिली. त्यावेळी गाडी रस्त्याखाली गेली. या अपघातात पत्नी रेन्सीला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मरण पावली. बिजो किरकोळ जखमी झाला. त्यांना साखळी इस्पितळात आणले असता रेन्सी हिचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी डिचोली पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी बिजो जॉय यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक गोपाळ गावस व हरिष गावस यांनी पंचनामा केला.