स्वतंत्र भारताचे आझाद साहेब!

0
248
  •  प्रा. नागेश सु. सरदेसाई.

आज आपल्या देशातले वाढते साक्षरतेचे प्रमाण आणि देशात असलेले उच्च शिक्षणाचे मोठे जाळे यासाठी देश कलाम आझाद साहेबांचा सदासर्वकाळ ऋणी राहील. दर वर्षी ११ नोव्हेंबर या त्याच्या जयंती दिनी ‘‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कलाम साहेबांना समर्पित करुन देशाने त्यांचा आदरसन्मान केला आहे.

मौलाना सय्यद अबुल कलाम उर्फ गुलाम मुईउद्दीन अहमद बीन. ख्युरद्दीन अल हुसैन आझाद या थोर देशप्रेमी नेत्याचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी आताच्या सौदी अरब देशांतल्या मक्का या शहरामध्ये झाला. त्यांनी आझाद हे टोपण नाव घेतलं कारण त्या नावाचा ‘मुक्ती’ हा अर्थ होतो. मौलाना म्हणजे गुरु असं असल्यानं त्यांची शिक्षण क्षेत्रात आवड व रुचि प्रचंड होती.

त्यांना त्यांच्या वडिलांनी लहान असतानाच भारतात आणलं. त्याच वयापासून ते कविता करण्यात पटाईत होते. त्यांनी उर्दु भाषेमध्ये पुष्कळ कविता रचल्या. तरुण वयात असताना त्याचा अभ्यास धर्म, आणि तत्वज्ञान या विषयांवर केंद्रीत झाला. त्यांनी जगातल्या विविध धर्मांचा अभ्यास करुन पुस्तकं लिहिली. त्यांचा झुलेखा बेगम यांच्याशी विवाह झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वतःला झोंकून दिले आणि फिंरगी ब्रिटीश राजवटीला भारतामधून दूर करण्यासाठी विविध कष्ट घेतले. त्यांनी विशेषत्वाने मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला. त्यांनी यासाठी पत्रकारितेची वाट धरली. त्यांनी आपल्या लेखणीने लोकांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवून देण्याचे महत्त्वाचे काम प्राधान्याने केले. त्यानी भारत देशात शिक्षणाचा पायंडा घालून दिला. जेवा त्यांनी पत्रकार म्हणून नाव कमावले तेव्हा त्यांनी संघटित असलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसचे एक विशेष म्हणजे त्यात विविध धर्म, पंथ, जातीचे लोक एकत्रितपणे देशाच्या सुटकेसाठी परिश्रम घेत होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस १८८५ साली स्थापन झाली होती व सर्वधर्माच्या लोकांसाठी त्याचे द्वार खुले होते. मौलाना १९२३ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. विशेष म्हणजे महात्मा गांधी यांचे त्यावेळी त्यांना भरपूर मार्गदर्शन लाभले. लोकमान्यांच्या मृत्युनंतर १९२० चा काळ… कॉंग्रेससाठी एक कठीण काळ समजला जातो. आझाद फक्त ३५ वर्षाचे असताना त्यांनी अध्यक्षाची धुरा सांभाळणे म्हणजे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या थोर नेतेमंडळींचे समर्थन. त्यांनी या दशकात खिलाफत चळवळीमध्ये भाग घेऊन त्याला एक दिशा देण्याचे कार्य केले. १९१९ साली रॉलट कायद्याविरुद्ध गांधीच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरगच्च कामगिरी केली. त्यांची काळांत शिक्षणाचा पाया घालण्यासाठी अलिगढ शहरात जामिया मिलिया झसालमिया संस्थेची स्थापना केली. १९३४ साली त्या संस्थेचे दिल्ली शहरामध्ये स्थलांतर झाले. अशाप्रकारे मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उभारला. १९३० साली दांडी सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला. त्यांनी कलकता शहरामध्ये स्थायिक होऊन वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व घेतलं. त्यात हिंदी, उर्दु, फारसी, इंग्रजी, बंगाली, अरबी भाषांचा समावेश आहे. त्यांनी मजलिस, हनाफी मलिकी, शफीकी इत्यादीवर अभ्यास करुन इस्लाम धर्माचे तत्वज्ञान समाजासमोर आणण्यासाठी परिश्रम घेतले.
भारतामध्ये बिट्रीश सामाज्याच्या काळांत उच्च शिक्षण फार कमी होतं. त्याची जाण त्यांना होती. ते त्यावेळी उच्च शिक्षण भारतात समाजातल्या वेगवेगळ्या लोकांमध्ये पोहचवण्यासाठी तळमळत होते. त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांशी वाटाघाटी करुन विद्यापीठ दर्जापर्यंतचे शिक्षण मिळवून देण्यासाठी विश्‍वविद्यालय अनुदान आयोग म्हणजे युनिव्हर्सिटी अनुदान आयोग (यु.जी.सी.) संस्थेची स्थापना केली. आज जर आपण एक धावती नजर फिरवली तर आपल्याला एक गोष्ट निश्‍चितपणे दिसून येईल की आज भारतात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन जवळ जवळ सातशे विद्यापीठे भारतात आहेत. याचे जनक मौलाना आझाद साहेब आहेत, असे आम्ही म्हणू शकतो. त्याचप्रमाणे तांत्रिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांची विशेष दुरदृष्टी होती. भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे ज्याला आपण खपवळरप खपीींर्ळींीरींश जष ींशलहपेश्रेसू म्हणून ओळखतो त्याचा पायंडा पण त्यांनी घालून दिला. आज जगातल्या प्रथम दोनशे संस्थांमध्ये त्यांचं स्थान आहे. या संस्थामधून शिक्षण घेऊन जगातल्या वेगवेगळ्या तांत्रिक संस्थामध्ये वावर करणारे आपले तरुण सदाच आझाद साहेबांचे ऋणी असतील. त्यांनी कुरान हा इस्लाम धर्मग्रंथ योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. कविता करण्यात कलाम साहेब तरबेज होते. त्यांचा नाइरंग-ए-आलम हा कवितासंग्रह जगभरात प्रसिद्ध झाला. अल-मिसबाह या वर्तमानपत्राचे संपादकपद त्यांनी भुषवले. त्यांच्या आत असलेला पत्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नसे. वेगवेगळ्या मुस्लिम संस्थाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आझादसाहेब कॉंग्रेसपक्षाबरोबर सदैव राहिले. १९४० च्या दशकात तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सलग सहा वर्षे अध्यक्ष होते. त्यावेळी महात्माजीनी दिलेल्या ‘छोडो भारत’ या १९४२च्या आंदोलनामध्ये त्यांची मोलाची भुमिका होती. कॉंग्रेस पक्ष एकजूट ठेवणे आणि वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना स्वातंत्र्यासाठी तयार करणे तसेच ब्रिटीश साम्राज्याला भारतांतून बाहेर काढणे हा एकच उद्देश होता.

मौलाना आझाद यांचे निःस्वार्थ कार्य आणि देशाबद्दलचे प्रेम आजच्या देशवासियांनी अंगिकारणे ही काळाजी गरज आहे. देशाच्या विभाजनानंतर पं. जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रीमंडळात भारताचे प्रथम शिक्षणमंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. पं. नेहरु, सरदार पटेल, राजकुमारी अमृत कौर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादीच्या मंत्रीमंडळात त्यांनी आपले स्थान घेतले. शिक्षण क्षेत्राला आपले एक विशेष स्थान मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी होती. १९४७ सालचा भारत आणि आजचा भारत यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार केला तर विलक्षण तफावत जाणवते. त्यावेळी भारतातील साक्षरतेचे प्रमाण फारच कमी होते. प्राथमिक शिक्षण व आरोग्य ही त्यावेळेची सरकारची प्राथमिकता होती. मौलाना आझादांच्या नेतृत्वाखाली गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी फार यत्न करण्यात आले. त्यांनी इंग्रजी भाषेत ‘‘इंडिया विन्स फ्रिडम’’ हे पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकाची फारच प्रसिद्धी झाली. ‘गुबर कलाम-ए-खातिर’ ही त्याची महत्वाची कामगिरी. त्यांनी यात मनुष्याच्या मनातले वेगवेगळे भाव या विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला.

त्यांना भारताचा सर्वोच्च नागरि सन्मान ‘‘भारत रत्न’’ त्यांना बहाल करण्यात आला. त्यांचा २२ फेब्रुवारी १९५७ साली वयाच्या सत्तराव्या वर्षी देहान्त झाला. देश जरी आज आझाद साहेबांना मुकला आहे, तरी त्यांनी शिक्षण प्रसारासाठी केलेले प्रयत्न सदैव सर्वांच्या लक्षात राहतील. त्यांनी मुस्लिम समाजामध्ये मुलीच्या शिक्षणावर विषेश भर दिला होता. आज आपल्या देशातले वाढते साक्षरतेचे प्रमाण आणि देशात असलेले उच्च शिक्षणाचे मोठे जाळे यासाठी देश कलाम आझाद साहेबांचा सदासर्वकाळ ऋणी राहील. दर वर्षी ११ नोव्हेंबर या त्याच्या जयंती दिनी ‘‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कलाम साहेबांना समर्पित करुन देशाने त्यांचा आदरसन्मान केला आहे.
आज आम्ही त्यांचे स्मरण करताना आपल्या शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याची गरज आहे व आपल्या देशाला जागतिक स्तरांवर योग्य स्थान मिळवून देण्याची गरज आहे.