स्वच्छता तिथे देवत्वस्वच्छता तिथे देवत्व

0
1668

– कालिका बापट

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा| पुनरपी संसारा येणे नाही॥ साधुसंतांनी मनाच्या, चित्ताच्या स्वच्छतेबाबत आपल्या अभंगातून जागृती केली आहे. आयुष्य सुङ्गल व्हायचे असेल तर मन, काया आणि आपला परिसरही तेवढाच स्वच्छ राखला पाहीजे. हाच तर आपल्या जगण्याचा सुखी मार्ग

माणसाच्या जीवनातील सर्वांत महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती स्वच्छता. मग ती मनाची असो, शरीराची, आपल्या घराची, आजुबाजुच्या परीसराची, अगदी राष्ट्रसेवेच्या भावनेतून जागलेली स्वच्छ भारताची. स्वच्छता हा देवत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे. देवत्वाकडे जाण्याचा अर्थ देव होणे नव्हे तर मनाच्या, शरीराच्या, आपल्या परिसराच्या स्वच्छतेमुळे निरोगी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण होय.
सर्व गोष्टींसाठी पैसा, धन लागते. परंतु स्वच्छता ही अशी गोष्ट आहे जी स्वत: करायची असते आणि ती पैशांशिवाय करणे सहज शक्य आहे. कारण निसर्गाने आपल्याला सूर्याची तेजस्वी किरणे, जलस्त्रोत बहाल केले आहेत. ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची स्वच्छता करतो, म्हणजे केलीच पाहीजे. त्याचप्रमाणे आपल्या परिसराची स्वच्छता हे आपले कर्तव्य आहे. निदान जे कुणी साङ्ग- सङ्गाई करतात त्यांना सहकार्य करणे हे तर आपल्या हातात असते. आपण बरेचदा निरीक्षण नक्कीच केले असेल. एखाद्या इस्पितळात किंवा सार्वजनिक ठिकाणी साङ्गसङ्गाई चाललेली असते. ती व्यक्ती पोटासाठी हे काम करते. परंतु साङ्गसङ्गाई करीत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालत असतो.
जरा जाणिवेने चाललात तर ङ्गरशी खराब होणार नाही आणि जी व्यक्ती काम करते तिलाही तिच्या कामाची कदर केल्यामुळे समाधान लाभेल. सकाळच्या वेळी रस्ते-गल्ल्यांमध्ये सङ्गाई कामगार साङ्गसङ्गाईचे काम करीत असतात. तेव्हा एवढे भान असणे गरजेचे आहे की, जी साङ्गसङ्गाई चालली आहे ती आपल्यासाठी. विचार करा, शहरांमध्ये जर दोन दिवस साङ्गसङ्गाईच झाली नाही तर चित्र काय दिसेल? काही दिवसांपूर्वी सङ्गाई कामगारांचा संप झाला तेव्हा मार्केट परिसर दुर्गंधीने भरला होता. आपला परिसर साङ्ग ठेवणे हे केवळ सङ्गाई कामकागारांचेच काम नव्हे तर परिसर अधिक घाण होऊ देऊ नये हे आपले नागरिकांचे कर्तव्य आहे. आपण सहजच कचरा ङ्गेकत असतो. कुठलेही भान न ठेवता. बाटल्या, कागद सहज ङ्गेकतो. बाहेरच्या देशांमधली थोरवी आपण गातो. आणि आपल्याच देशात घाण करतो. आपल्यात आणि विदेशी लोकांमध्ये काय ङ्गरक आहे स्वच्छतेबद्दल हे परवाच अनुभवायला मिळाले. १८ जून रोडवरच्या एका दुकानात विदेशी जोडपे आपल्या किशोरवयीत मुलांसमवेत शीतपेय घेत होते. तिथे भारतीय पर्यटक पण होते. आपल्या गोमंतकीयांना स्वच्छतेची जाणीव आहे. त्यामुळे आपण सहसा भान ठेऊन वागत असतो. तर शीतपेय प्याल्यावर त्या मुलांनी कचरापेटीत व्यवस्थित रिकामे पेले टाकले. तर आपल्याच भारतीय जोडप्याने कचरापेटी असूनही सवयीप्रमाणे अगदी रस्त्यालगतच टाकून दिले. त्या किशोरवयीन मुलांनी ते रिकामे पेले अलगद उचलून कचरापेटीत टाकले. हे त्या जोडप्याच्या लक्षात आले असूनही आभार मानण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविले नाही. हेच चित्र दाखवायचे का आपण आपल्या अतिथींना? आणि भारतीय संस्कृतीचा बडेजाव सांगताना ‘अतिथी देवो भव’ची संकल्पना आपण मांडतो. कशासाठी? मोठेपणासाठी? असे म्हणतात, ‘जिथे स्वच्छता तिथे देवत्व वसते’. स्वच्छता राखली तर निरोगी परीसर आपल्याला मिळेल आणि निरोगी जीवनामुळे आपण अधिक चांगल्या पध्दतीने काम करू शकू. इतर राज्यांच्या तुलनेत त्या मानाने आपण आपला गोवा स्वच्छ राखण्यात हातभार लावला आहे.
एका बाजुला जिथे सकाळच्या वेळी सङ्गाई कामगार काम करतात तर दुसर्‍या बाजुला बरीचशी लोकं कामाला, ऑङ्गिसला, मुलांना शाळेत पोचवायला जाताना कचर्‍याची पिशवी घेऊन जातात आणि वाटेत कुठेतरी लपून छपून रस्त्याच्या कडेला किंवा नदी नाल्यात हा कचरा टाकतात. विचार करा, हाच कचरा पुन्हा कुणीतरी आणून तुमच्या दारात टाकला तर?  आणि असं होतंही बरं का!!! हल्लीची तरूण मंडळी अशा बाबतीत खूपच जागरूक असतात. मागे एकदा मांडवी पुलावरून जाताना पाहिलेले दृष्य आठवले. एक बाई स्कुटरवरून आली. थोडावेळ रेंगाळली आणि कुणी पाहात नाही ते बघून कचरा मांडवीत ङ्गेकण्यास सज्ज झाली. इतक्यात एका तरूणाने त्या बाईला अडवले. त्या बाईला गुर्मी एवढी की मानायलाच तयार नाही. हे होईस्तोवर पुलावर गल्ला झाला आणि त्या बाईला सर्वांना तोंड द्यावे लागले. असे जागरूक नागरिक असल्यास आपल्या देशाचे भवितव्य चांगलेच असणार. आपण हमरस्त्यावरील कडेला पाहिल्यास लक्षात येइंल की लोकं जाता जाता सहजच कचरा ङ्गेकून जातात. खरं तर कचर्‍याचे नियोजन योग्य रीतीने व्हावे यासाठी सरकारी यंत्रणा पंचायत स्तरापासून कार्यरत आहे. तरीही असंवेदनशील वृत्तीचे लोक आपला मनमानी कारभार चालवतातच.  ग्रामीण भाग सोडल्यास आता सगळीकडेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. जे असा कचरा टाकतात, त्यांनी सांभाळून वागावे.
अजून एक सर्वात प्रखरतेने भेडसावणारा प्रश्न म्हणजे शौचालयांचा. काही दिवसांपूर्वी भूमी पेडणेकर आणि अक्षयकुमार यांचा टॉयलेट हा चित्रपट येऊन गेला. शौचालय का असावे हे मनोरंजनाच्या माध्यमातून जागृती करणारा हा चित्रपट. आजही शौचालये असूनही उघड्यावर जाणारी लोकं आहेत, ज्यांना स्वच्छतेचा कानमंत्र कळला नाही.
गेल्या वर्षी कला आणि संस्कृती संचालनालय आयोजित डी डी कोसंबी विचार महोत्सवात मिस्टर टॉयलेट नावाने जगभर ओळखले जाणारे जॅक सीम यांचे व्याख्यान झाले होते. जगभर ङ्गिरून या महत्वाच्या प्रश्नावर जॅक सीम यांनी अभ्यासू वृत्तीने आढावा घेतला होता. आपला भारतच नव्हे तर आशिया खंडातील कितीतरी देशांमध्ये शौचालयांची पुरेशी व्यवस्था नाही. जॅक सीम हे खरे तर उद्योजक. आशिया खंडात प्रवास करताना त्याला या समस्येची जाणीव झाली व पुढे समाजाप्रती कर्तव्य भावनेने शौचालये प्रत्येक घरासाठी असावे या दृष्टीने जागृती करण्यास सुरूवात केली. याचाच भाग म्हणून नोव्हेंबरच्या १९ तारखेला दरवर्षी ‘जागतिक टॉयलेट दिवस’ साजरा केला जातो.
अजुन एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जी बोलली जात नाही परंतु ती बोलली पाहिजे. २८ मे रोजी ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ मनवला जातो. या माध्यमातून महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करणे हाच उद्देश होय. बडोद्याच्या स्वाती बेडेकर गावागावात, खेडोपाड्यात, आदिवासींमध्ये जाऊन मासिक पाळी स्वच्छतेबाबत जागृती करतात. एवढेच नव्हे तर कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स् कसे करायचे याविषयी मार्गदर्शन करतात. आपण देवळं मंदिरांमध्ये प्रवेश करण्याच्या गोष्टी बोलतो मग स्वच्छतेबद्दल बोलायला नको?
बाणावली येथील एक तरुण क्लिटंन वाझ हा कचरा नियोजनाचा व्यवसाय करतो. अभियंता असलेला हा तरुण गोवा कचरामुक्त करण्याच्या भावनेतून काम करतो. आता त्याने हा आपला व्यवसाय केला आहे. घराघरातून कचरा गोळा करून त्याचे कामगार या कचर्‍याची विल्हेवाट लावतात. त्याच्या मते सगळ्यात मोठी समस्या आहे ती सॅनिटरी पॅडस्‌च्या कचर्‍याची.  घराघरातून कचरा गोळा करताना हाही कचरा येतोच. एवढेच नव्हे तर रस्त्याच्या कडेलाही हा कचरा सर्रास टाकला जातो. खरं तर अशा कचर्‍याची घरच्या घरीही आपण विल्हेवाट लावू शकतो.कचर्‍याची विल्हेवाट किंवा स्वच्छतेसंदर्भात काम करणारा आणखी एक तरुण म्हणजे डॉ. सैल. वैद्यकीय पेशा असूनही वैद्यकीय आस्थापने, औषधालये इ. ठिकाणच्या कचर्‍याचे नियोजन करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. बर्‍याच जणांचे म्हणणे असते, आपण आपला गोवा स्वच्छ ठेवतो. परंतु बाहेरचे येऊन इथे घाण करतात. हल्लीच एका वर्तमानपत्रावर रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करणार्‍या पर्यटकांचे छायाचित्र पाहिले. एका दुकानात या छायाचित्रावर बरीच चर्चा चालली होती. बाहेरचे लोक येऊन गोवा कसे घाण करतात, यावर बोलले जात होते. इतक्यात त्यातील एक जण म्हणाला, ‘आपले लोक काही कमी नाहीत. मुरडेश्वर, महालक्ष्मी कोल्हापूर, पंढरपूर, शिर्डीला जाणारी आपली लोकं तिथे जाऊन हेच करतात’. धार्मिक, सामाजिक स्थळे हा आपलाच परीसर आहे, हे आपण मनापासून मानले तर आपला देश स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असेल. मग कुणी आपल्या राज्याला, देशाला नावं ठेवणार नाही. गरीबीने ग्रासलेल्या आपला देशाला अस्वच्छतेचा ठपका बसला आहे. आपण घरातच स्वच्छतेचे नियम पाळलेत तर स्वच्छता अभियान व्यवस्थितपणे तडीस नेऊ. जॅक सीमने आपल्या व्याख्यानात भारत अस्वच्छतेबाबत अग्रेसर असल्याचे सांगितले तेव्हा अनेकांना खटकले होते. कारण आपण आपल्या देशावर मनापासून प्रेम करतो. म्हणूनच स्वच्छता हीच सेवा मानून आपल्या घरातला कचरा तरी नदीनाल्यात, हमरस्त्यावर आपण यापुढे टाकणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. ……………………………………………………………………………