स्पोर्टिंग दवर्लीला काणा बाणावली चषक

0
123

दवर्लीच्या स्पोर्टिंग क्लबने काल रविवारी मार्ना शिवोलीच्या सेंट अँथनी स्पोटर्‌‌स क्लबवर ३-० असा विजय प्राप्त करताना ४२व्या काणा बाणावली आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. काणा बाणावली स्पोर्टिंग क्लबने दांडो येथील सेंट जॉन दी बाप्तिस्ट मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. विजयी संघाकडून ६०व्या मिनिटाला क्लिफ्टन बार्रेटो याने पहिला गोल लगावला. दोनच मिनिटांनी माबेल मिरांडाने संघाची आघाडी दुप्पट केली. वाल्मिकी मिरांडाने तिसरा गोल लगावून सामना सेंट अँथनीच्या अवाक्याबाहेर नेला. विजेत्या संघाने ४०,००० रुपये व करंडकाची कमाई केली. उपविजेत्यांना ३० हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. होली ट्रिनिटी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रा. इसाबेल ज्युलियाना फर्नांडिस यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

वैयक्तिक बक्षिसे ः स्पर्धेतील सर्वोत्तम आघाडीपटू ः विपुल पेडणेकर (सेंट अँथनी, शिवोली), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम बचावपटू ः जॉडरेल गोम्स (दवर्ली स्पोर्टिंग), स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक ः सचिन अष्टेकर (दवर्ली स्पोर्टिंग), उदयोन्मुख खेळाडू ः जोसबर्न फर्नांडिस (काणा बाणावली), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ः शेर्विन लोबो (सेंट अँथनी, शिवोली).