सोसिएदादला नमवून रेयाल माद्रिद अव्वल

0
119

सर्जियो रोमोस व करीम बेंझेमा यांनी केलेल्या शानदार गोलांच्या बळावर रेयाल माद्रिदने रेयाल सोसिएदाद संघाचा २-१ असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लिगा स्पर्धेतील आगेकूच कायम राखली आहे.
सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले.

दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर सर्जियो रोमोसने ५० मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करत रेयालला आघाडी मिळवून दिली. यावेळी माद्रिदने रेयाल सोसिएदाद संघाचा बचाव भेदला. त्यानंतर करीम बेंझेमाने ७० व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी २-० अशी वाढवली. मायकल मेरिनो याने ८३ व्या मिनिटाला गोल करत रेयाल सोसिएदाद संघाच्या आशा वाढवल्या होत्या. यानंतरही सामन्याची काही मिनिटे बाकी होती. रेयाल सोसिएदादच्या खेळाडूंनी आक्रमक चालीही रचल्या पण त्यांना रेयाल माद्रिदचा बचाव भेदत बरोबरी साधता आली नाही.

अखेर हा सामना रेयाल माद्रिदने २-१ असा जिंकला. या सामन्यातील विजयामुळे माद्रिदने बार्सिलोनाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. या स्पर्धेच्या इतिहासात रेयालने प्रथमच बार्सिलोनाला गटवारीत मागे टाकले आहे. या दोन्ही संघांचे गुणतक्त्यात ६५ गुण असले तरीही रेयालने गोलसंख्येच्या बाबतीत त्यांना मागे टाकत अग्रस्थान पटकावले आहे. रेयालने ५७ गोल करताना २१ गोल स्वीकारले असून बार्सिलोनाने ६९ गोल करत ३१ गोल स्वीकारले आहेत. ५३ गुणांसह सेविला तिसर्‍या क्रमांकावर आहे.