सोशल मीडियाच्या सकारात्मकतेचे दर्शन

0
171
  • ऍड. प्रदीप उमप

अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील प्रत्येक समाजघटक भयभीत होता. सामाजिक वातावरण चिघळण्याची चिंता प्रत्येकाला होती. विशेषतः सोशल मीडियाकडे सर्वांचे अधिक लक्ष होते. मात्र, या सर्व प्रकरणात सोशल मीडिया युजर्सनी दाखवलेले वैचारिक प्रगल्भतेचे दर्शन निश्‍चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

सोशल मीडिया हे केवळ आपले वा इतरांचे विचार मांडण्याचे माध्यम राहिलेले नाही. या माध्यमाचे परिणाम समाजजीवनावरही होत असतात. मात्र, दुर्दैवाने या माध्यमाचा दुरुपयोगही होताना दिसतो. किंबहुना, या माध्यमाची अलीकडील काळात दुरुपयोगामुळेच अधिक चर्चा होताना दिसते. या माध्यमातून पसरणार्‍या अङ्गवांमुळे काही वेळा अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळेच अयोध्यासारख्या संवेदनशील प्रकरणाच्या निकालावरून सोशल मीडियावरून प्रसारित होणारे विचार आणि त्यातून उपटणार्‍या प्रतिक्रिया यांमुळे समाज व सरकार या दोघांनाही चिंता वाटणे स्वाभाविक होतेे. मात्र, या सर्व प्रकरणात सोशल मीडिया युजर्सनी जबाबदार नागरिकाची भूमिका निभावली, याचा आनंद आहे. यात न्यायालयीन निर्णयाचा सन्मान ठेवण्याचे आणि देशाचे सामाजिक वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्याचे भान याचा प्रत्यय देशाला आला. अनेकांनी आपला दृष्टिकोन किती परिपक्व आहे, याचा परिचय यातून दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी समाजात कोणतीही कटुता अथवा भडकाऊ विचार पसरणार नाहीत, याची काळजी समाजमाध्यमांकडून घेतली गेली. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या मुद्द्यावर सहमती किंवा असहमती व्यक्त केली, मात्र अतिउत्साहात कोणाचे मन दुखावेल अशी कोणतीही गोष्ट केली नाही. तसेच विरोध करताना असभ्य भाषा आणि नकारात्मक टीका-टिप्पणीचा वापर केला नाही. या सर्व प्रकरणात सोशल मीडिया युजर्सनी ङ्गेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्विटर व इन्स्टाग्राम या माध्यमातून अशा पोस्ट अथवा टीकाटिप्पणी शेअर केली नाही, अन्यथा हे सर्व खूप मोठ्या समस्येला कारण ठरले असते.

खरेतर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादावर न्यायालयाचा निर्णय सोशल मीडिया आणि त्याच्या वापरकर्त्यांची परीक्षा पाहणारा होता. अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक वेळा या माध्यमातून वैचारिक अराजकतेचा प्रसार झालेला पाहायला मिळाला आहे. याचा परिणाम समाजजीवनावर होऊन सामाजिक वातावरण बिघडल्याचे बर्‍याच वेळा सिद्ध झाले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या काळात याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राने घेतली आहे. खरेतर तांत्रिक विकासामुळे आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या सोशल मीडियाचे कोणत्याही गोष्टीचे त्वरित आदान-प्रदान होण्यात खूप मोठे योगदान आहे. वास्तविक अशा समाजमाध्यमांवर खोट्या बातम्या, असभ्य भाषा, द्वेषपूर्ण अङ्गवा आणि कटुता पसरविणारे प्रकारही पाहायला मिळाले आहेत. खोटे व्हिडीओ व्हायरल केले गेले आहेत. याच कारणाने अयोध्या प्रकरणाच्या निर्णयावेळी देशातील अनेक शहरांतील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी स्थानिक पातळीवर संभाव्य धोके आणि संवेदनशील ठिकाणे यांची माहिती करून घेतली. ज्यामुळे या माध्यमातून नकारात्मक स्थिती निर्माण होणार नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी नागरिकांसाठी ऍडव्हायजरी लागू केली. महाराष्ट्र पोलिसांच्या ऍडव्हयजरीद्वारे अयोध्या प्रकरणात सवोच्च न्यायालयाच्या निकालाशी निगडित पोस्ट सोशल मीडियावर टाकताना सावधगिरी बाळगण्याचा आणि कोणत्याही पोस्टमधून व्यक्ती किंवा धार्मिक भावना दुखावणारे संदेश न पाठविण्याचा सल्ला देण्यात आला. अशा वातावरणात जिंकल्याचा जल्लोष अथवा कोणाचीही चेष्टा न करता संयम पाळण्याचा आणि परिसरात सामाजिक सलोखा कायम ठेण्यासाठी साहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आनंदाची गोष्ट अशी की, सामान्य लोकांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. आक्षेपार्ह टीका-टिप्पणीपासून लोक लांब राहिले. कट्टर आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी विचारांची टीका-टिप्पणी केली नाही. एवढेच नाही, तर सोशल मीडिया युजर्सनी एकमेकांच्या सद्भावना जपण्याचे आवाहन केले. निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करण्याचा मोठेपणा दाखविला.

भारतासारख्या लोकशाही व्यवस्था असणार्‍या देशात सोशल मीडिया युजर्सच्या वाढत्या संख्येने त्यांच्या वैचारिक प्रभावाची वास्तविकता वाढवली आहे, ही बाब निश्‍चितच अभिनंदनीय आणि दिलासादायक आहे. अभिव्यक्ति स्वातंत्र्य असणार्‍या आपल्या देशात सर्व प्रकारचे, सर्व वयोवर्गातील लोक या आभासी मंचावर सक्रिय आहेत. ङ्गेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्रामसहित सोशल प्लॅटङ्गॉर्मवर लोकांचे वाचण्या-पाहण्याची व शेअर करण्याची सवय वाढते आहे. इंटरनेट आणि स्मार्टङ्गोनमुळे आता केवळ मोठ्या शहरांतीलच नाही, तर गाव-खेड्यांतील लोकही सोशल मीडियाद्वारे देश-विदेशांशी जोडले जात आहेत. आकडे सांगतात की, आपल्याकडे युजर्स आठवड्यातील कमीत कमी १७ तास सोशल मीडियावर घालवतात.

काही दिवसांपूर्वी मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांत केल्या गेलेल्या ऍसोचेमच्या कौटुंबिक सर्वेक्षणात ८० टक्के लोकांनी त्यांच्या घरातील तरुण सकाळी सकाळी वेगवेगळ्या सोशल साइट्‌सवर असतात. ज्यावर त्यांच्या आवडत्या विषयांच्या माहितीचा मोठ्या प्रमाणात भांडार आहे. हेही खरे आहे की, या माध्यमांद्वारे सर्व विषयांची माहिती एका क्लिकवर लोकांपर्यंत पोहोचते. एवढेच नाही, तर संबंधित विषयावर व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियावर लोकांना व्यसपीठ मिळते. कोणत्याही विषयावर लोक आपले मत व्यक्त करू शकतात. अशा वेळी न्यायालयीन निकाल, सरकारी धोरणे व सामाजिक विषयांवर विचारविनिमय होत असतात. बर्‍याच वेळा या विषयांशी संबंधित गोष्टी कटुता आणि द्वेष निर्माण करतात. सहमती किंवा असहमतीचा भाव निंदानालस्ती आणि व्यक्तिगत टीका-टिप्पणीपर्यंत पोहोचतो. काही क्षणांत कितीतरी आधारहीन बातम्या व्हायरल केल्या जातात. मायक्रोसॉफ्टने जगभरातील २२ देशांत केलेल्या अभ्यासानुसार ६४ टक्के भारतीय नागरिकांना खोट्या बातम्यांचा सामना करावा लागतो. दुखाची गोष्ट ही की, अशा आभासी जगातील अङ्गवांवर लोक विश्‍वासही ठेवतात. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्‌सऍपवर पसरलेल्या मुलेचोरीच्या अङ्गवांमुळे जमावाकडून झालेल्या मारहाणीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. किती ही नकारात्मकता? अशा काही गोष्टी समाजात खून-मारहाणीचे कारण बनल्या आहेत.

सोशल मीडियाच्या वापराबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान असणेही तेवढेच गरजेचे आहे. सोशल मीडिया युजर्सच्या दायित्वभावनेचा हाच पैलू अयोध्या निर्णयाच्या वेळी पाहायला मिळाला. लोकांनी सामाजिक सद्भाव टिकवून ठेवणाच्या विचारांचा प्रसार केला. अशा वेळी अभिव्यक्तीच्या या व्यासपीठाचा सामान्यजनांनी केलेला सकारात्मक वापर एक नवी उमेद जागवत आहे. कोणताही गदारोळ करण्यापेक्षा अर्थपूर्ण संवाद साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तंत्रविकासामुळे मिळालेल्या या सुविधा एक उत्तम बदलाचे माध्यम बनू शकताता. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, सर्वसामान्य लोक यात उत्स्ङ्गूर्तपणे सहभागी होताना दिसत आहेत. सोशल मीडिया युजर्सची ही परिक्वता आणि सौहार्दता भविष्यातही पाहायला मिळेल, अशी आशा करूया.