सोनसड्यावरील आगीवर नियंत्रण ः धुराचे लोट कायम

0
110

सोनसडा येथे कचरा यार्डाला लागलेली आग सातव्या दिवशी आटोक्यात आणण्यात यश आले आहे. शनिवारपासून मातीचा थर व माती मिश्रीत पाणी शिंपडल्याने आग विझू शकली. मात्र धूराचे लोट अजूनही दिसत आहेत. त्यामुळे तेथील लोकांना अजूनही राहणे कठीण बनले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस व मामलेदार गांवकर स्थितीवर देखरेख ठेवून आहेत.

मडगाव पालिकेचे ५० पेक्षा जास्त कामगार मातीचा थर समपातळीवर आणण्याच्या कामात गुंतले आहेत. रस्त्याच्या बाजूकडील कचर्‍यावर माती टाकण्याचे काम आधी हाती घेतले आहे. व त्याला ७५ टक्के यश आल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले.

एक दोन दिवसात आग विझविण्यात यश येईल. पण धूरामुळे जवळपासच्या घरांतील लोकांना, मायणा कुडतरीच्या लोकांना त्रास झालेला असून त्यांची आरोग्याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे.

आतापर्यंत शंभरहून अधिक ट्रक माती आणून टाकली आहे. पण आग खोलवर लागलेली असल्याने काही महिन्यानंतर पुन्हा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.