सूर्यग्रहण पाहण्याचा ‘योगा’योग!

0
185

यावर्षीचे पहिले आणि अखेरचे सूर्यग्रहण पाहण्याची संधी गोव्यातील अनेकांनी घेतली. ग्रहण सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी सुरू झाले. भारतात ते १० वाजून १ मिनिटाने दिसले. उत्तर भारताच्या काही भागांमध्ये चंद्राने सूर्याला ९८ टक्के झाकून टाकले होते. तेथे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले. तर उर्वरित भारतात ते खंडग्रास दिसले. गोव्यात बहुतेक लोकांनी गच्ची तसेच बाल्कनीमधूनही हे ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.