सुषमा स्वराजांच्या विमानाचा संपर्क तुटल्याने गोंधळ

0
166

मॉरिशस दौर्‍यासाठी विदेश व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना घेऊन जाणार्‍या विमानाचा काही काळासाठी संपर्क तुटल्याने शनिवारी बराच गोंधळ उडाला. त्रिवेंद्रम येथून या विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याचा सुमारे १४ मिनिटे संपर्क तुटल्याने ही स्थिती निर्माण झाली.

त्रिवेंद्रम येथून शनिवारी दु. २.०८ वा. स्वराज यांच्या या विमानाने मॉरिशससाठी उड्डाण केले होते. सुमारे १४ मिनिटे संबंधित यंत्रणांशी असलेला या विमानाचा संपर्क तुटला. मात्र अखेर संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. स्वराज तेथून दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गेल्या आहेत. या दरम्यान त्या तेथील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. रडार यंत्रणेतील दोषामुळे सुषमा स्वराज यांच्या विमानाचा संपर्काबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.