सुशील कुमारला ५५ लाख

0
127

प्रो रेसलिंग लीगच्या तिसर्‍या सत्रासाठी दोनवेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार याला दिल्ली सुलतान संघाने ५५ लाख रुपये मोजून घेतले आहे. शनिवारी रात्री उशिरा या स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा झाला. महिलांमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती असलेल्या हेलन मोरोलिस (५७ किलोंखालील) या अमेरिकेच्या खेळाडूवा हरियाणा हॅमर्सने ४४ लाख खर्च केले. ऑलिम्पिक पदक विजेच्या साक्षी मलिकला मुंबई महारथीने ३९ लाखांना आपल्या संघात घेतले. ६५ किलो वजनी गटात खेळणार्‍या बजरंग पूनिया (२५ लाख), विनेश फोगट (४० लाख) व गीता (२८ लाख) यांना युपी फ्रेंचायझीने आपल्या संघाचा भाग बनवले. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता असलेल्या इराणच्या हसन रहिमी याला हरियाणाने २१ लाखांना खरेदी केले. त्याचे आधारमूल्य २१ लाख होते. ६५ किलो गटात खेळणार्‍या रशियाच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या सोसलान रोमानोव याच्यासाठी मुंबईने ३८ लाख मोजले. पहिल्या दोन सत्रात किरकोळ यश मिळविलेल्या या स्पर्धेेचे तिसरे सत्र ९ जानेवारीपासून होणार आहे.
लिलावात फ्रेंचायझींनी खरेदी केलेले अन्य काही महत्त्वाचे खेळाडू ः सुन यानान (२२.५० लाख, हरियाणा हॅमर्स), इलियास बेकबुलातोव (३४ लाख, पंजाब रॉयल्स), ओडुनायोव फोलसांदे (३५ लाख, मुंबई महारथी), मारवा अमरी (२५ लाख, वीर मराठा)