‘सुर जहॉं’ संगीत महोत्सवाची रंगतदार सांगता

0
139

कला आणि सांस्कृतिक संचालनालयाने बांगला नाटक डॉट कॉम व कला अकादमीच्या सहयोगाने आयोजित केलेल्या ‘सुर जहॉं’ विश्‍वशांती संगीत महोत्सवाची काल इल्लीका सोलो रङ्गाईल (स्विडन), ओटावा यो (रशिया) व पंजाब कव्वाली (भारत) या रंगतदार कार्यक्रमांनी सांगता झाली. तिन्ही दिवस या महोत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

इल्लिका, सोलो व रङ्गाईल या स्विडन, सेनिगल व मेक्सिको येथील संगीतकारांचा एकत्रित सांगितिक आविष्कार शुक्रवारी रसिकांना प्रभावित करून गेला. या कार्यक्रमातील इल्लीका ङ्ग्रिसेल या स्विडनच्या विख्यात लोकसंगीतकाराने लोकसंगीतावर अनेक प्रयोग केले आहेत व त्याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला. सोलो सिस्सोखो हे या कार्यक्रमात कोरा हे वैशिष्ट्यपूर्ण वाद्य वाजवतात. ते उत्कृष्ट गायकही आहेत. बिबीसी वर्ल्ड म्युझिक पुरस्काराचे हे दोन्ही कलाकार मानकरी आहेत. त्यांना अष्टपैलू वादक (पर्कशनिस्ट) रङ्गाईल सिदा मिळाले आणि त्यांचे त्रिकुट जमले.
ओटावा यो कार्यक्रमात रशियन लोकसंगीताचा आनंद रसिकांनी लुटला. स्लावोनिक जमातीच्या ‘पागन’ परंपरेची मुळे या कार्यक्रमात कुठेतरी रुतलेली आहेत. यात रशियन लोकसंगीत, पुन्क, रॉक, सिने व कार्टुन साऊंड ट्रॅक याचा ओटावा यो यांनी कल्पकतेने संगम साधत संगीतश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
पंजाब कव्वाली कार्यक्रमाने तर महोत्सवाची लज्जत अधिकच खुलली. वर्का-अमृतसर येथील रंझान अली कव्वाल व साथींनी रसिकांची उत्स्ङ्गूर्त दाद घेतली. रंझान अली हे मिरासी जमातीमधील असून ते पारंपरिक ‘बल्लाड’ गायक आहेत. बुल्लेह शहा, बाबा ङ्गरिद, शहा हुसेन, सचाल सरमस्त या नामवंत कविंच्या रचना त्यांनी सादर केल्या. ऊर्दू आणि पंजाबी रचनांनी त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. राणा मुहम्मद, मौसम अली, गुलशन, किसन सिंग, बुट्टा मुहम्मद, गुरुप्रीत सिंग व रणजित सिंग या कलाकारांचा त्यात समावेश होता.