सुब्रतो रॉयना पॅरोल नामंजूर

0
127

गुंतवणूकदारांच्या देय १० हजार कोटी रूपयांची व्यवस्था करण्यासाठी विदेशातील हॉटेल्स विकायची आहेत असे सांगून सहारा समूहाचे चेअरमन सुब्रतो रॉय यांनी मागितलेला ४० दिवसांचा पॅरोल (सशर्त मुक्तता) सर्वोच्च न्यायालयाने काल नामंजूर केली. दरम्यान, १० हजार कोटी रूपयांची व्यवस्था करणे हे रॉय व अन्य दोन संचालकांच्या जामिनावर सुटकेची एक अट आहे. दरम्यान, हॉटेल विक्रीसाठी ठोस प्रस्ताव आल्याचे कोर्टाला पटले तर वाटाघाटी व विक्रीसाठी रॉय यांची सकाळी १० ते संध्याकाळी ४ या काळासाठी सुटका करू असे कोर्टाने सांगितले. रॉय यांच्या दोन गृहबांधणी कंपन्या गुंतवणूकदारांचे २४ हजार कोटी रूपये देणे आहे, त्यासंबंधी सेबीच्या तक्रारीनंतर रॉय यांना ४ मार्च रोजी अटक केली होती.