‘सीएसके’ संघात परतला धोनी

0
174

इंडियन प्रीमियर लीगच्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्स संघात महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना व रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहे. दोन मोसमातील बंदीनंतर पुनरागमन करणार्‍या ‘सीएसके’ने या त्रिकुटाला राखत आपल्या पाठिराख्यांना सुखद धक्का दिला.

दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने आपला सर्वांत यशस्वी कर्णधार गौतम गंभीर याला सोडण्याचा निर्णय घेतला. दिल्लीनेदेखील क्विंटन डी कॉकसारख्या खेळाडूला मुक्त करून अचंबित केले. २७ व २८ जानेवारी रोजी खेळाडूंचा लिलाव होणार असून राखलेल्या खेळाडूंची नावे देण्यासाठी काल गुरुवार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ फ्रेंचायझींना देण्यात आली होती.

४ ते २७ एप्रिल या कालावधीत यंदाची आयपीएल स्पर्धा होणार आहे. काही फ्रेंचायझींनी कमी किंमत मोजून खेळाडूंना आपल्या संघात राखले. परंतु, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक खेळाडूसाठी ठरवून दिलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वजा करण्यात आली. त्यामुळे फ्रेंचायझीने खर्च केलेली रक्कम कमी असली तरी त्यांच्या खात्यातून ठरलेली रक्कम वजा करण्यात आली आहे.

केवळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहली याला जास्त १७ कोटी (ठरवलेली रक्कम १५ कोटी) देऊन राखले आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यातून पहिल्या खेळाडूसाठीच्या १५ कोटींऐवजी १७ कोटी वजा करण्यात आले आहे.
१. चेन्नई सुपरकिंग्स ः राखलेले खेळाडू ः १. महेंद्रसिंग धोनी ः १५ कोटी, २. सुरेश रैना ः ११ कोटी, ३. रवींद्र जडेजा ः ७ कोटी, खर्च रक्कम ः ३३ कोटी, शिल्लक रक्कम ः ४७ कोटी, राईट टू मॅच ः २ शिल्लक. २. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः राखलेले खेळाडू ः १. विराट कोहली ः १७ कोटी, २. एबी डीव्हिलियर्स ः ११ कोटी, ३. सर्फराज खान ः १.७५ कोटी, खर्च रक्कम ः ३१ कोटी, शिल्लक रक्कम ः ४९ कोटी, राईट टू मॅच ः २ शिल्लक, ३. कोलकाता नाईट रायडर्स ः राखलेले खेळाडू ः १. सुनील नारायण ः ८.५ कोटी, २. आंद्रे रसेल ः ७ कोटी, खर्च रक्कम ः २१ कोटी, शिल्लक रक्कम ः ५९ कोटी, राईट टू मॅच ः ३ शिल्लक, ४. दिल्ली डेअरडेव्हिल्स ः राखलेले खेळाडू ः १. ऋषभ पंत ः ८ कोटी, २. ख्रिस मॉरिस ः ७.१ कोटी, ३. श्रेयस अय्यर ः ७ कोटी, खर्च रक्कम ः ३३ कोटी, शिल्लक रक्कम ः ४७ कोटी, राईट टू मॅच ः २ शिल्लक, ५. किंग्स इलेव्हन पंजाब ः राखलेला खेळाडू ः१. अक्षर पटेल ः ६.७५ कोटी, खर्च रक्कम ः १२.५ कोटी, शिल्लक रक्कम ः ६७.५ कोटी, राईट टू मॅच ः ३ शिल्लक, ६. सनरायझर्स हैदराबाद ः राखलेले खेळाडू ः १. डेव्हिड वॉर्नर ः १२ कोटी, २. भुवनेश्‍वर कुमार ८.५ कोटी, खर्च रक्कम ः २१ कोटी, शिल्लक रक्कम ः ५९ कोटी, राईट टू मॅच ः ३ शिल्लक, ७. राजस्थान रॉयल्स ः राखलेले खेळाडू ः१. स्टीव स्मिथ ः १२ कोटी, खर्च रक्कम ः १२.५ कोटी, शिल्लक रक्कम ः ६७.५ कोटी, राईट टू मॅच ः २ शिल्लक, ८. मुंबई इंडियन्स ः राखलेले खेळाडू ः १. रोहित शर्मा ः १५ कोटी, २. हार्दिक पंड्या ः ११ कोटी, ३. जसप्रीत बुमराह ः ७ कोटी, खर्च रक्कम ः ३३ कोटी, शिल्लक रक्कम ः ४७ कोटी, राईट टू मॅच ः २ शिल्लक.