सिद्धार्थ, महादेव नाईक यांची मालमत्ता जाहीर

0
159

माजी मंत्री महादेव नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी मालमत्तेचा तपशील लोकायुक्तांना काल सादर केला. लोकायुक्तांनी मालमत्तेचा तपशील सादर न करणार्‍या १२ राजकारण्यांची नावे जाहीर केली होती. त्यात माजी मंत्री महादेव नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावाचा समावेश आहे. वर्ष २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात आमदार म्हणून कार्यरत असलेल्यांना मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे.