सिकेरी ते बागा रस्त्यावरील ३०० अतिक्रमणे हटवणार

0
180

>> वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आस्थापनांना नोटिसा

उत्तर गोवा नगर नियोजन प्राधिकरणाने (एनजीपीडीए) सिकेरी ते बागा या किनारी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी या मुख्य रस्त्याच्या रूंदीकरण क्षेत्रात येणार्‍या हॉटेल व अन्य आस्थापनने मिळून सुमारे ३०० जणांना अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावली आहे.

या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या रस्त्याचे रूंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ता रूंदीकरणाबरोबरच सुशोभिकरण आणि पार्कींग व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. या योजनेसाठी प्राधिकरणाने ३०० आस्थापनांच्या मालकांना नोटीस बजावली आहे. रस्ता रूंदीकरणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उत्तर गोवा नगरनियोजन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा उपसभापती मायकल लोबो यांनी केले आहे.

रस्त्याच्या बाजूला पार्किंग बरोबरच पदपथ, गटार व भूमिगत वाहिन्यांची व्यवस्था करण्यात येईल. मोठी हॉटेल व इमारतीसमोरील पाच मीटर जागा तसेच रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांकडून अडीच मीटर जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे कांदोळी पंचायत क्षेत्रातील काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.