सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

0
127
India's Venkata Pusarla hits a return against Australia's Wendy Hsuan-Yu Chen during their badminton women's singles round of 16 match at the 2018 Gold Coast Commonwealth Games on the Gold Coast on April 12, 2018. / AFP PHOTO / Saeed KHAN

रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने आपला तुफानी फॉर्म कायम राखत २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. उपउपांत्यपूर्व फेरीत तिने ऑस्ट्रेलियाच्या सुआन यू वेंडी चेन हिला सरळ गेममध्ये २१-१५, २१-९ असे हरविले. कारेरा स्पोटर्‌‌स एरेनावर झालेल्या या सामन्यात २२ वर्षीय सिंधूने केवळ ३४ मिनिटांत प्रतिस्पर्ध्याला गारद केले. उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी सिंधूचा सामना कॅनडाच्या ब्रिटनी टाम हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांतने ‘अंतिम ८’ खेळाडूंमध्ये प्रवेश करताना श्रीलंकेच्या निलुका करुणारत्ने याला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविला. श्रीकांतने २१-१०, २१-१० असा विजय साकार केला. पुढील फेरीत त्याला सिंगापूरच्या रायन याच्याविरुद्ध खेळावे लागणार आहे.

अन्य भारतीयांचे निकाल ः उपउपांत्यपूर्व फेरी ः एच.एस. प्रणॉय वि. वि. ख्रिस्तोफर जॉन पॉल (सिंगापूर) २१-१४, २१-६, सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा वि. वि. क्रिस्टन त्साय व नाईल याकुरा (मलेशिया) २१-१०, २१-७, प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी वि. वि. डॅनी बावा ख्रिसनांटा व जिया यिंग क्रिस्टल (सिंगापूर) २१-१९, २१-१३, रुत्विका गड्डे वि. वि. जिया मिन येव (सिंगापूर) २१-१०, २१-२३, २१-१०, सायना नेहवाल वि. वि. जेसिका ली (आईल ऑफ मॅन) २१-४, २-०, सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी वि. वि. आतिश लुबा व ख्रिस्तोफर जॉन पॉल (मॉरिशस) २१-८, २१-१२