सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

0
131

भारताची स्टार महिला शटलर पीव्ही सिंधूने आपला विजयी धडाका कायम राखताना काल गुरुवारी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करीत ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे सिंधूने महिला एकेरीत भारताचे आव्हान जिवंत राखले आहे.

चौथ्या मानांकित सिंधूने दुसर्‍या फेरीत थाइलंडच्या विश्व क्रमाक ११ नित्चाओन जिंदापोल हिच्यावर मात केली. सायनाने १ तास ६ मिनिटे चाललेली ही लढत २१-१३, १३-२१, २१-१९ अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले.
सिंधून पहिला गेम सहज जिंकला. दुसर्‍या गेममध्ये दमदार पुनरागमन करताना जिंदापोलने बाजी मारली. परंतु संघर्षपूर्ण ठरलेल्या तिसरा आणि निर्णायक गेम २६ मिनिटांत जिंकत सिंधूने अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळविले. आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची गाठ सातव्या मानांकित जपानच्या नोझोमी ओकुहाराशी पडणार आहे.
दरम्यान, पुरुष एकेरीत भारताच्या एचएस प्रणॉयने टॉमी सुगिर्यातोचा २१-१०, २१-१९ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.