साळावली धरणग्रस्त जमीन प्रश्‍नावर तोडग्याचे आश्‍वासन

0
104

साळावली धरणग्रस्तांच्या जमीन मालकी हक्क प्रश्‍नावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी विधानसभेत काल दिले. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी साळावली धरणग्रस्तांच्या प्रश्‍नासंबंधीचा खासगी ठराव मांडला होता. मंत्री पालयेकर म्हणाले की, साळावली धरणग्रस्तांच्या जमिनीचा मालकी हक्काच्या प्रश्‍नासाठी जानेवारी महिन्यात खास बैठक घेतली जाणार आहे. गेली तीस – पस्तीस वर्षे साळावली धरणग्रस्तांच्या प्रश्‍नावर तोडगा निघालेला नाही. २५५ कुटुंबीयांनी ४०० चौरस मीटर जागेसाठी अर्ज केले. त्यातील ९९ जणांच्या अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी जमीन मालकी हक्क मिळवून देण्याच्या प्रयत्नांना गती देण्याची मागणी केली.