साळगाव प्रकल्पातून कदंबच्या बायोगॅस बसेसना इंधन मिळणे शक्य : कार्लुस

0
95

बायोगॅस व बायो इथेनॉलवर चालणार्‍या कदंब महामंडळाच्या एकूण तीन बसेसचा शुभारंभ काल करण्यात आला. साळगाव येथील कचरा प्रकल्पांतून अशा प्रकारच्या ५० बसेसना पुरवण्याजोगे इंधन मिळू शकणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सरकार अशा ५० बसेस खरेदी करून या कचरा प्रकल्पातून मिळणार्‍या इंधनावर या बसेस चालवणार असल्याची माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी दिली. या इंधनामुळे वायूप्रदूषण होत नसल्याचे ते म्हणाले.
प्रायोगिक तत्वावरील या बसेसना सध्या कोल्हापूर येथून इंधन आणले जाणार असून ते पर्वरीतील डेपोत ठेवले जाणार आहे. या तीन बसेस् प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यासाटीचा समझोता करार काल कदंब महामंडळाने ‘स्कानिया’ या कंपनीशी केला.
समझोता करारानुसार कदंब महामंडळ आपल्या मार्गांवर या बसेस् चालवण्यास सदर कंपनीला परवानगी देणार असून महामंडळाचा डेपोही वापरू देणार आहे, वायु प्रदूषण होत नसल्याचे ते म्हणाले.