साळगावकरचा आकर्षक विजय

0
89

मडगाव (क्री. प्र.)
रोनाल्डो ओलिविराने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर साळगावकर फुटबॉल क्लबने धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या जीएफए प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेतील आपल्या शुभारंभी सामन्यात कोअर ऑफ सिग्नल्सचा ४-० असा एकतर्फी पराभव करीत शानदार विजयी सलामी दिली. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपले. दुसर्‍या सत्रात साळगावकर एफसीने आक्रमक सुरुवात करताना रोनाल्डो ओलिविराने ५५व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलमुळे खाते खोल. गॉडफ्रे मस्कारेन्हासने आघाडी २-० अशी केली. मॅकरॉय पिशोतोने संघाला ३-० अशा आघाडीवर नेले. तर रोनल्डोने साळगावकर एफसीच्या ४-० अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा चौथा गोल नोंदविला.