सायना-सिंधू उपांत्यपूर्व फेरीत समोरासमोर

0
141

भारताच्या पीव्ही सिंधी आणि सायना नेहवाल यांनी जकार्तात सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या आपल्या शुभारंभी लढती जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत त्या दोघी समोरासमोर ठाकणार आहेत.

दुखापतीतून सावल्यानंनतर पुनरागमन केलेल्या सायनाने काल चीनच्या जागतिक २०व्या स्थानावरील चेन शियाओशिनवर २७ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१२, २१-१८ अशी मात केली. तर सिंधूने एकतर्फी झालेल्या लढतीत मलेशियाच्या गोह जिन वेईचे आव्हान २१-१२, २१-९ असे संपुष्टात आणले.
पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने चीनी ताइपैच्या लियाओ मिन चुन आणि सु चिंग हेंग या जोडीवर २१-१७, २१-१६ अशी मात करीत अंतिम आठांत स्थान मिळविले.