सायना अंतिम फेरीत

0
100

ओडेन्स
भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने आपली विजयी घोडदौड कायम राखताना डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दुसर्‍यांदा धडक दिली. पुरुष एकेरीत मात्र भारताच्या किदाम्बी श्रीकांतचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले.
काल झालेल्या महिलांच्या उपांत्य फेरीत सायनासमोर आव्हान होते ते इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्काचे. परंतु सायनाने मारिस्काचे आव्हान २१-११, २१-१२ अशा सरळ सेट्‌समध्ये मोडित काढत स्पर्धेची दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत सायनाने जपानच्या नोझुमी ओकुहारावर मात केली होती. दरम्यान, पुरुषांच्या एकेरीत भारताचा स्टार खेळाडू किदम्बी श्रीकांतचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. उपांत्य फेरीत त्याला जपानच्या केंटो मोमोटाकडून २१-१६, २१-१२ असा पराभव स्वीकारावा लागला. श्रीकांतने लिन डॅन, समीर वर्मा यांना पराभूत करीत उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली होती. परंतु त्याला मोमोटाचे आव्हान पेलवले नाही.