सातार्‍यात कंटेनर ट्रकखाली चिरडून आठ ठार

0
81

सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा येथे बसची वाट पाहणार्‍या लोकांवर कंटेनर ट्रक कलंडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत किमान ८ जण ठार व १५ जण जखमी झाले. कालच्या या दुर्घटनेतील ठार झालेल्यांची ओळख पटली नसल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेवेळी कंटेनर ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता. जखमींना सातारा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या निकटवर्तियांना प्रत्येकी २ लाख रु.च्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.