साकेतला वाईल्डकार्ड

0
120

व्हिएतनाममधील चॅलेंजर स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकावलेल्या साकेत मायनेनी याला ५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या पुणे ओपनसाठी पुरुष एकेरीत वाईल्ड कार्डप्रवेश देण्यात आला आहे. त्याच्यासह श्रीराम बालाजी, आर्यन गोवियास व अर्जुन काढे यांनादेखील आयोजकांनी वाईल्ड दिले आहे. दुखापतीमुळे २०१७च्या मोसमातील अधिकांश भागाला मुकल्यामुळे मायनेनीचे एकेरी रँकिंग ९१२ पर्यंत घसरले आहे. मायदेशातील या पहिल्याच चॅलेंजर स्पर्धेत युकी भांब्री (१४०वे स्थान) व रामकुमार रामनाथन (१४८वे स्थान) यांच्यावर एकेरीत भारताची मदार असेल. मागील वर्षीचा उपविजेता प्रज्ञेश गुणेश्‍वरन यालादेखील थेट मुख्य ‘ड्रॉ’मध्ये स्थान देण्यात आले आहे. जागतिक क्रमवारीत ९८व्या स्थानावर असलेला स्लोवेनियाचा ब्लाझ कावसिच व ८६व्या स्थानावरील मोलदोवाचा राडू आल्बोट हे खेळाडू या चॅलेंजर स्पर्धेतील प्रमुख आकर्षण असतील. आज ११ व उद्या १२ रोजी पात्रता फेरी होणार असून सोमवारपासून मुख्य स्पर्धा खेळविली जाणार आहे.