सांगोल्डा येथे हाईप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

0
143

>> मुख्य संशयितासह तिघांना अटक

>> चार युवतींची सुटका

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने सांगोल्डा येथे २१ मार्च रोजी छापा घालून एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून चार युवतींची सुटका करण्यात आली आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मुख्य संशयित कपिल शर्मा ऊर्फ बंटी (४५), स्वप्निल सिंग, गुजरात (२४) आणि सुनील सिंग, हरयाणा (२८) यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने काल दिला.

पोलिसांनी कारगाडी, दोन स्कूटर आणि सहा मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी सुटका केलेल्या युवतींमध्ये नेपाळ येथील तीन आणि मुंबईतील एका युवतीचा समावेश आहे. त्यांची मेरशी येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजन निगळ्ये, पोलीस निरीक्षक राहुल परब, उपनिरीक्षक सुजय कोरगावकर, हवालदार एस. एस. साळगावकर, हवालदार अशोक गावडे, कॉन्स्टेबल उमेश देसाई, विनायक सावंत, महिला हवालदार एस. बी. नाईक, आश्‍विनी देसाई, महिला कॉन्स्टेबल संजना राऊत देसाई यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल परब तपास करीत आहेत.