सांगलीकर सिद्धार्थ ठरला सर्वात महागडा खेळाडू

0
93

>> प्रो-लीग कबड्डी पर्व ७ लिलाव; १ला दिवस

मराठमोळा सांगलीचा गडी सिद्धार्थ देसाई प्रो-लीग कबड्डी लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मात्र तेलगू टायटन्सने १ कोटी ४५ लाखांच्या बोलीवर सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखले आहे.
सांगली येथील या मराठमोळ्या खेळाडूने गेल्या वर्षी प्रो-लीग कबड्डी स्पर्धेत शानदार कामगिरी करीत आपली छाप पाडली होती. त्यामुळे तेलगु टायटन्सने त्याला आपल्या संघात कायम राखले आहे. तेलगु टायटन्सबरोबरच सिद्धार्थला आपल्या संघात ठेवण्यासाठी तामिळ थलायवाज संघानेही कोटीच्या वर बोली लावली होती. परंतु अखेर तेलगू टायटन्सने त्यात बाजी मारताना १ कोटी ४५ लाखांच्या बोलीवर त्याला आपल्या संघात कायम राखण्यात यश मिळविले.

कालच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बोली लागलेले अव्वल ६ कबड्डीपटू पुढील प्रमाणे ः
१. सिद्धार्थ देसाई (तेलगू टायटन्स) १ कोटी ४५ लाख रुपये, २. नितिन तोमर (पुणेरी पलटण) १ कोटी २० लाख रुपये, ३. राहुल चौधरी (तामिळ थलायवाज) ९४ लाख रुपये, ४. मोनू गोयत (युपी योद्धा) ९३ लाख रुपये, ५. संदीप नरवाल (यू मुम्बा) ८९ लाख, ६. मोहम्मद इस्माईल (बंगाल वॉरियर्स) ७७.७५ लाख.