सरकारी विद्यालयांमध्ये ५६९ शिक्षकांची कमतरता

0
106

राज्यातील सरकारी विद्यालयांमध्ये ५६९ शिक्षकांची कमतरता आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्या एका अतारांकीत प्रश्‍नाला विधानसभेत काल दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.

आमदार आलेमाव यांनी राज्यातील सरकारी, सरकारी अनुदानप्राप्त आणि खासगी शाळांची संख्या आणि आवश्यक शिक्षकवर्ग आणि आत्ताचा शिक्षक वर्गाच्या संख्येबाबत प्रश्‍न विचारला होता. राज्यातील सरकारी, सरकारी अनुदानित आणि खासगी शाळांसाठी एकूण १२,९२९ शिक्षकांची गरज आहे. त्यात सरकारी विद्यालयासाठी ३५७६, सरकारी अनुदानित विद्यालयांसाठी ७७५८ आणि खासगी शाळांसाठी १५९५ शिक्षकांचा समावेश आहे. राज्यातील शिक्षकांची आत्ताची संख्या १२,३६० एवढी आहे. सरकारी विद्यालयात ३००७, सरकारी अनुदानित विद्यालयात ७७५८ आणि खासगी विद्यालयात १५९५ शिक्षक कार्यरत आहेत. सरकारी विद्यालयामध्ये ५६९ शिक्षकांची कमतरता असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.