सरकारी खात्यांमधील घोटाळे रोखण्यात कॅगची भूमिका महत्वाची

0
132

>> मोदी ः नवी साधने विकसित करावी

सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी तांत्रिक साधने विकसित करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महालेखापाल (कॅग) परिषदेवेळी बोलताना केले. भारताला पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी ही कृती सहायक ठरू शकेल, असे ते म्हणाले.

सरकारी खात्यांमधील संभाव्य घोटाळे नियंत्रणाखाली आणण्यासाठी कॅगने नवनव्या पद्धती विकसित कराव्या असे मोदी म्हणाले. प्रशासनातील कौशल्य विकासासाठी लेखापाल महत्वाची भूमिका बजावू शकतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. २०२२ पर्यंत पुराव्यावर आधारीत धोरणाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची सरकारची इच्छा आहे. या अनुषंगाने ‘कॅग’ तपशील विश्‍लेषणावर लक्ष केंद्रीत करून सरकारसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकते असे मत त्यांनी मांडले.