सरकारी कर्मचार्‍यांसाठी आता बायो मेट्रिक मशीनचा वापर

0
115

राज्य सरकारच्या अनेक कार्यालयातील सरकारी कर्मचारी कामावर वेळेवर रुजू होत नसल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागाच्या प्रमुखांना अ, ब व क गटातील सरकारी कर्मचार्‍याच्या वक्तशीरपणा आणण्यासाठी बायो मॅट्रिक मशीनचा वापर करण्यासंबंधी एक परिपत्रक २८ जानेवारी २०२० रोजी जारी केले आहे.

सरकारी कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने सरकारी कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. लोकांची कामे वेळेवर मार्गी लावण्यात अडचण निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी कर्मचार्‍यांमध्ये वक्तशीरपणा आणण्यासाठी कडक पाऊल उचलण्याची सूचना केली आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या हजेरीचा प्रत्येक महिन्याला अहवाल तयार करून उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची सूचना परिपत्रकात करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या खास फार्ममधून उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांची नावे आणि कारवाईचा अहवाल सादर करण्याची सूचना केली असून हा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे.