सरकारी कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी आधार प्रणाली

0
69

सरकारी कर्मचार्‍याच्या हजेरीसाठी आधार एनेबल्ड बायोमॅट्रीक एटेंडन्स सिस्टमचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या १ डिसेंबर २०१७ पासून नवीन आधार सक्षम प्रणालीचा वापर सचिवालयातून केला जाणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक सर्वसाधारण प्रशासन विभागाने जारी केले आहे.
सरकारी कर्मचार्‍याच्या हजेरीत शिस्त आणण्याच्या उद्देशाने हजेरीसाठी बायोमॅट्रीक प्रणालीचा वापर केला जात आहे. सचिवालयातील कर्मचार्‍याच्या हजेरीसाठी २०१० मध्ये बायोमॅट्रीक प्रणालीचा वापर करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सचिवालयातील ‘क’ गट कर्मचार्‍यापासून या नवीन आधार सक्षम हजेरी प्रणालाची वापर केला जाणार आहे.