सरकारस्थापनेसंबंधी पत्र मागे घेण्याची ‘आप’ची मागणी

0
110

भाजपला दिल्लीत सत्तास्थापनेचे निमंत्रण देण्याकरिता नायब राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे परवानगी मागणारे पत्र लिहिले आहे, ते पत्र मागे घेण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी काल नायब राज्यपालांकडे केली.
राज्यपालांशी बैठकीनंतर बोलताना पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, सरकारस्थापन करण्यासाठी भाजपने घोडेबाजार चालवला आहे. आमच्या आमदाराला ४ कोटी रु देऊन विकत घेण्याचा प्रयत्न भाजप करत असतानाचे चित्रिकरण असलेली सीडी राज्यपालांना सादर केल्याचे ते म्हणाले. विधानसभा विसर्जित करण्याची मागणीही केल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला सरकारस्थापनेचे निमंत्रण देण्यासाठी परवानगी मागणारे पत्र मागे घेण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे ‘आप’ नेत्यांनी सांगितले.