समस्या थायरॉइडचीसमस्या थायरॉइडची

0
152

कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती पाहतो ज्या एकदम बारीक होत जातात किंवा काही केल्या त्यांचे वजन कमी होत नसते. किंवा काही व्यक्तींच्या गळ्याशी मोठी गाठ आलेली दिसते.इतकेच नाही तर मासिक पाळी अनियमित होणे, मूल न होणे, केस गळणे तसेच खूप घाम या अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. असे का होते, हे आपल्याला कळत नाही. अशा वेळी त्या व्यक्ती थायरॉईडचा शिकार झालेल्या असतात. अशा या थायरॉईडविषयी जाणून घेऊ या.वात, कफ आणि मेद जेव्हा दूषित होतं तेव्हा ते सगळे गळ्यामध्ये जमा होतात. त्यानंतर त्या ठिकाणी सूज येते. हळूहळू ही सूज वाढत जाते. यालाच आपण गलगंड झाले असे म्हणतो. आपल्या शरीरात काही अंत:स्राव करणार्‍या ग्रंथी असतात, ज्यांचे काम शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखणे असे असते. या ग्रंथींपैकीच एक ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी होय. ही ग्रंथी गळ्याच्या मधल्या भागात असते. यातून दोन प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडतात एक टी३ आणि दुसरे म्हणज टी ४. या ग्रंथी आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझमला नियंत्रित करण्याचे काम करतात.टी३ हे हार्मोन १० ते ३० मायक्रोग्राम आणि टी४ हे ६० ते ९० मायक्रोग्राम अशा स्वरूपात बाहेर पडत असतं. निरोगी व्यक्तीमध्ये या दोन्ही हार्मोन्सची मात्रा प्रमाणात असते. जेव्हा यात काही बिघाड होतो त्यावेळी या ग्रंथींचे प्रमाण हे वाढतं किंवा कमी होतं आणि या दोन्ही हार्मोन्सना नियंत्रित करण्याचं काम टीएसएच (थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन) नावाच्या हार्मोन्सला नियंत्रित ठेवते. इंडियन थायरॉईड सोसायटीच्या नुसार आज भारतात जवळपास ४.२ करोड भारतीय या थायरॉईड ग्रंथींमुळे त्रस्त आहेत तर ६० ते ७० टक्के लोकांना आपल्याला थायरॉईड आहे याची मुळात कल्पनाच नसते.हा अनुवंशिक आजार आहे. खाण्यात आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास, अति चिंता करणे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, रात्री जागरण करणे, तसेच मूड डिसऑर्डरची मात्रा दीर्घकाळ घेतल्याने हार्मोन्सची मात्र कमी होत जाते. त्यामुळे थायरॉईडच्या ग्रंथीचे संतुलन बिघडते.थायरॉईडचे प्रकारथायरॉईडचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ‘हाईपोथायराईडिज्म’ आणि दुसरा म्हणजे ‘हायपरथायराईडिज्म’. पैकी टी४ या थायरॉक्सिनची हार्मोनची पातळी कमी झाली तर टीएसएचची पातळी वाढते तेव्हा त्याला हाईपोथायराईडिज्म असे म्हणतात. तर टी४ या थायरॉक्सिनची हार्मोनची पातळी वाढल्यास टीएसएचची पातळी कमी होते तेव्हा या प्रकाराला हायपरथायराईडिज्म असे संबोधले जाते. थायरॉईडची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.. भूक कमी लागणे पण वजनात वाढ होत जाणे. हृदयाचे ठोके कमी होणे गळ्याच्या आसपासच्या भागात सूज येणे आळस वाटणे अशक्तपणा जाणवणे डिप्रेशनमनध्ये जाणे घाम कमी येणे त्वचा कोरडी होणे अधिक थंडी वाजणे अधिक म्हणजे उन्हाळ्यातही थंडी जाणवणे केसांच्या गळतीत वाढ होणे स्मरणशक्ती कमी होणे स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते. काही वेळा सुरुवातीला मासिक पाळी हळूहळू कमी होते आणि बंद होते. काही लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होतेकाय करावं? नियमित व्यायाम करावा. हा आजार गळ्याशी निगडित असल्यामुळे खाकरणे, किंवा गळ्यात कंपन निर्माण करणारी आसने तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत. शांत आणि स्वस्थ राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा. ताणतणाव, चिंता यापासून स्वत:ला दूर ठेवा. जीवनशैली व्यवस्थित ठेवा रागावर नियंत्रण ठेवा.काय खावे? हलका आहार घ्यावा, उदाहरण द्यायचे झाले तर दलिया, उकडलेल्या भाज्या आणि आमटी-पोळी खावी. अन्न शिजवताना कमी तेल किंवा तुपाचा वापर करावा. हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावानियंत्रित कसे कराल?हा आजार औषधांनी नियंत्रित केला जाऊ शकतो. पण कधी कधी काही केसेसमध्ये ऑपरेशनही करावं लागतं. आजाराच्या प्रकारावर किंवा गांभीर्यावर या आजाराची उपचारपद्धती अवलंबून असते. हाईपोथायराईडिज्म हा प्रकार औषधांनी नियंत्रित आणता येतो. हा गलगंड वाढत गेल्यास परिणामी ऑपरेशनशिवाय कोणताही पर्याय नसतो. कारण पुढे जाऊन थायरॉईड कॅन्सर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच तो गलगंड काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करणे आवश्यक असते. मात्र बहुतांश वेळा थायरॉईड ग्रंथीचा आजार नियंत्रित राखण्यास औषधांचा उपयोग होतो, त्यामुळे घाबरण्यासारखे काहीही नाही. म्हणूनच आपण आपल्या डॉक्टरांना वेळोवेळी आपल्याला काय होतंय, याची कल्पना देणं आवश्यक आहे.